Join us

Corona vaccination: "पाच कोटी लसींसाठी ग्लोबल टेंडर मागवले, पण…’’राजेश टोपेंनी दिली चिंता वाढवणारी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 7:55 PM

Corona vaccination in Maharashtra: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेऊन लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून तयारी सुरू आहे. त्यासाठी राज्य सरकारने लसींचे ग्लोबल टेंडर मागवले होते.

मुंबई - गेल्या दोन तीन महिन्यांपासून थैमान घातल असलेली कोरोनाची दुसरी लाट आता राज्यातून ओसरू लागली आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेऊन लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून तयारी सुरू आहे. त्यासाठी राज्य सरकारने लसींचे ग्लोबल टेंडर मागवले होते. मात्र या ग्लोबल टेंडरबाबत राजेश टोपे यांनी चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. 

महाराष्ट्र सरकारने कोरोनाविरोधातील लसीच्या पाच कोटी डोससाठी ग्लोबल टेंडर जारी केले होते. मात्र लसनिर्मात्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीमुळे आता राज्यातील व्यापक मोहिमेच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे.  

दरम्यान, कालपर्यंत महाराष्ट्रामध्ये दोन कोटी ३ लाख ३५ हजार ९९९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. १९ मे रोजी महाराष्ट्रामध्ये १ लाख १ हजार ९८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनाची लसमहाराष्ट्र सरकारराजेश टोपे