राज्यात ६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:07 AM2021-02-12T04:07:50+5:302021-02-12T04:07:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात गुरुवारी पार पडलेल्या १४२ लसीकरण सत्रात दिवसभरात ३४,८८९ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. ...

Corona vaccination of more than 6 lakh beneficiaries in the state | राज्यात ६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण

राज्यात ६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात गुरुवारी पार पडलेल्या १४२ लसीकरण सत्रात दिवसभरात ३४,८८९ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी १५,५९३ आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांना, तसेच १९,२९६ फ्रंटलाइन लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. यात ३४,७५३ लाभार्थ्यांना कोविशिल्ड या लसीने लसीकरण करण्यात आले आहे आणि १३६ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीने लसीकरण करण्यात आले.

राज्यात आतापर्यंत एकूण ६८,५७० लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले, त्यापैकी ५,२८५ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीने लसीकरण करण्यात आले. राज्यात दिवसभरात सर्वाधिक लसीकरण ठाण्यात झाले असून, लाभार्थ्यांची संख्या ४ हजार ९० इतकी आहे, तर त्यानंतर मुंबई उपनगरात ४ हजार ४९ आणि पुण्यात ३ हजार २७३ कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.

राज्यात मुंबईत आतापर्यंत ९६ हजार २४० लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. त्यात ८२ हजार ९४ आरोग्य कर्मचारी, तर १४ हजार १४७ फ्रंटलाइन कर्मचारी आहेत. मुंबईखालोखाल ठाण्यात ५८ हजार ३७७ आणि पुण्यात ५५ हजार ८६८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राज्यात सर्वांत कमी लसीकरण वाशिम, हिंगोली, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत दिसून आले आहे. वाशिममध्ये ४ हजार ९४९, हिंगोलीत ४ हजार ६३२, सिंधुदुर्गमध्ये ५ हजार ३६९ आणि उस्मानाबाद येथे ६ हजार ५१९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

Web Title: Corona vaccination of more than 6 lakh beneficiaries in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.