Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादाळामुळे मुंबईतील कोरोना लसीकरण उद्या बंद, प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 07:31 PM2021-05-16T19:31:59+5:302021-05-16T19:32:29+5:30

मुंबईत सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयातील कोविड-१९ लसीकरण पूर्णतः बंद राहणार आहे.

Corona vaccination in Mumbai to be stopped tomorrow due to cyclone tauktaee | Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादाळामुळे मुंबईतील कोरोना लसीकरण उद्या बंद, प्रशासनाचा निर्णय

Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादाळामुळे मुंबईतील कोरोना लसीकरण उद्या बंद, प्रशासनाचा निर्णय

Next

मुंबई : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे वाहणारे वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून उद्या सोमवार दिनांक १७ मे २०२१ रोजी मुंबईत सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयातील कोविड-१९ लसीकरण पूर्णतः बंद राहणार आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्या लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 

Web Title: Corona vaccination in Mumbai to be stopped tomorrow due to cyclone tauktaee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.