corona vaccination : मुंबई महानगरपालिकेचा घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 08:04 AM2021-03-30T08:04:45+5:302021-03-30T08:05:38+5:30

corona vaccination update : मुंबई पालिकेचा घरोघरी जाऊन लसीकरणाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. मुंबई पालिकेने वृद्ध, दिव्यांगांसाठी घरोघरी जाऊन लसीकरणासाठी प्रस्ताव तयार केला होता.

corona vaccination: Mumbai Municipal Corporation's proposal for home vaccination was rejected by the Central Government | corona vaccination : मुंबई महानगरपालिकेचा घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला

corona vaccination : मुंबई महानगरपालिकेचा घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला

Next

मुंबई : मुंबई पालिकेचा घरोघरी जाऊन लसीकरणाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. मुंबई पालिकेने वृद्ध, दिव्यांगांसाठी घरोघरी जाऊन लसीकरणासाठी प्रस्ताव तयार केला होता. मात्र केंद्रीय आरोग्य विभागाने घरोघरी लसीकरणासाठी धोरण नसल्याचे सांगत हा प्रस्ताव नाकारला. 
लसीकरण केंद्रांचा विस्तार काही प्रमाणात छोट्या-छोट्या लसीकरण केंद्रांपर्यंत लहान स्तरापर्यंत केला जाणार आहे. जेणेकरून लोकांना कोविडची लस घेण्यासाठी दोन किलोमीटरच्या पुढे प्रवास करावा लागणार नाही. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, मुंबईत जवळपास दीड लाखांहून अधिक वृद्ध, काही अंथरुणावर खिळलेले, काही दिव्यांग आहेत. ते लसीकरणासाठी घराबाहेर जाऊ शकत नाहीत. यासंदर्भात केंद्राला पत्र लिहिले होते. अशा नागरिकांना घरी जाऊन लस देण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, केंद्राने असे कोणतेही धोरण नसल्याचे सांगितले. 
केंद्रीय आरोग्य विभागाच्या स्पष्टीकरणानुसार, देश सध्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या मध्यभागी आहे. लसीकरण सूक्ष्म पातळीवर नेण्याची केंद्राची योजना असून या योजनेत नागरिकांना लसीकरणासाठी दोन किमीपेक्षा जास्त प्रवास करावा लागणार नाही.  

 

Web Title: corona vaccination: Mumbai Municipal Corporation's proposal for home vaccination was rejected by the Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.