मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या आता पूर्वीपेक्षा तिप्पट झाली आहे. मात्र, आजही सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याने धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर्वीप्रमाणे सक्रिय सहकार्य केल्यास या संकटावर पुन्हा नियंत्रण आणणे शक्य आहे. यासाठी लस घेतल्यानंतरही स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.कोरोना प्रतिबंधात शिथिलता आल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम मुंबईत सध्या दिसून येत आहेत. दररोज आठ हजारांहून अधिक बाधित रुग्ण सापडत असल्याने आरोग्ययंत्रणेवरील ताण वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने दररोज एक लाख लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, कोरोनावर औषधोपचार आणि हमखास तोडगा नसल्याने नागरिकांनी जीवनशैलीमध्ये आलेली शिथिलता बदलण्याची गरज असल्याचे मत पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी व्यक्त केले आहे.वैयक्तिक हे नियमही पाळण्याची आवश्यकता पुरेसा व योग्यवेळी आहार, पुरेशी झोप, व्यायाम - योग - प्राणायाम आदींद्वारे प्रतिकारशक्ती टिकवून ठेवावी.कोणतेही वाहन चालविताना, वाहनांतून प्रवास करतानाही मास्कचा वापर करणे आवश्यक आहे.बंदिस्त वातावरण टाळावे. याचप्रमाणे गर्दीत जाणे किंवा निकटचा संपर्कही टाळावा. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर शक्यतो टाळावा.बाहेरून आलेल्या व्यक्ती घरात प्रवेश केल्यानंतर थेट स्नानगृहात जाताना ज्या-ज्या ठिकाणावरून चालत गेली असेल, ती जागा प्रथम साबणाच्या पाण्याने पुसून घ्यावी. त्यानंतर केवळ पाण्याने भिजवलेल्या ओल्या फडक्याने व नंतर कोरड्या फडक्याने पुसून कोरडी करावीकोविडची लक्षणे असल्यास कुठे-कुठे गेलो आणि कोणा-कोणाला भेटलो, ते आठवावे. शक्यतो भेटीच्या नोंदी ठेवाव्यात.ही शिस्त महत्त्वाचीतोंडावर मास्क, सुरक्षित अंतर, वारंवार साबणाने हात धुणे, निर्जंतुकीकरणाचा वापर याबरोबरच आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक आहे.
Corona Vaccination: मुंबईकरांनो! लस घेतल्यानंतरही स्वयंशिस्त पाळायला हवी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 2:22 AM