Join us

Corona Vaccination : आजपासून ६२ खासगी रुग्णालयांत पुन्हा लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 5:50 AM

Corona Vaccination: १० एप्रिल रोजी एक लाख ३४ हजार ९७० अशा एकूण दोन लाख ३३ हजार ९७० काेराेना प्रतिबंधात्मक  लसींचा साठा मागील दोन दिवसांमध्ये  उपलब्ध झाल्या आहेत.

मुंबई : लसींचा साठा उपलब्ध झाल्याने ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयांत १२ एप्रिलपासून पुन्हा लसीकरण सुरू होणार आहे. महापालिका आणि शासनातर्फे ४९, तर खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून प्रतिदिन ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते.   लसीकरणासाठी मंजुरी मिळालेल्या ७१ खासगी रुग्णालयात १० एप्रिल आणि ११ एप्रिल असे दोन दिवस लसीकरण थांबले होते, तर पालिकेच्या, शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू होते.  ९ एप्रिल रोजी रात्री उशिरा ९९ हजार लसी आणि १० एप्रिल रोजी एक लाख ३४ हजार ९७० अशा एकूण दोन लाख ३३ हजार ९७० काेराेना प्रतिबंधात्मक  लसींचा साठा मागील दोन दिवसांमध्ये  उपलब्ध झाल्या आहेत. उपलब्ध झालेल्या या साठ्यामुळे खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रासाठी लस साठा वितरित करण्यात आला आहे. यामुळे १२ एप्रिल रोजी नियमित वेळेत ७१पैकी ६२ खासगी लसीकरण केंद्र कार्यान्वित राहतील.

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस