Corona vaccination: मुंबईतील नायर रुग्णालयात लहान मुलांच्या लसीकणासाठी नोंदणी सुरू, सुरुवातीला ५० मुलांना दिली जाणार लस    

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:52 PM2021-07-12T23:52:51+5:302021-07-12T23:53:05+5:30

Corona vaccination in Mumbai: झायडस कॅडिला’ कंपनीने पालिकेच्या पत्राला सकारात्मक उत्तर देत लसीकरणासाठी तयारी दर्शवली आहे. त्यानुसार नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.

Corona vaccination: Registration for vaccination of children begins at Nair Hospital, Mumbai | Corona vaccination: मुंबईतील नायर रुग्णालयात लहान मुलांच्या लसीकणासाठी नोंदणी सुरू, सुरुवातीला ५० मुलांना दिली जाणार लस    

Corona vaccination: मुंबईतील नायर रुग्णालयात लहान मुलांच्या लसीकणासाठी नोंदणी सुरू, सुरुवातीला ५० मुलांना दिली जाणार लस    

Next

मुंबई - ‘झायडस कॅडिला’ कंपनीने पालिकेच्या पत्राला सकारात्मक उत्तर देत लसीकरणासाठी तयारी दर्शवली आहे. त्यानुसार नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.  यामध्ये ५० मुलांना ‘झायकॉडी’ लस देण्यात येणार आहे. यासाठी सोमवारपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे.(Registration for vaccination of children begins at Nair Hospital, Mumbai)

कोरोनाची दुसरी लाट मुंबईत आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता असून लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने जम्बो कोविड केंद्र, कोरोना काळजी सेंटरमध्ये खाटांची व्यवस्था केली आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी पेडियाट्रिक वॉर्ड सुरू करण्याचे नियोजन केले आहे. 

तर दुसरीकडे पालिकेने लहान मुलांच्या लसीकरणासाठी महिनाभरापूर्वी ‘झायडस कॅडिला’ कंपनीला पत्र दिले होते. यास सकारात्मक प्रतिसाद देत झायडस कॅडिला कंपनीने लहान मुलांवरील लसीकरण करण्यास तयारी दाखवली आहे. यासाठी नायर रुग्णालयात पहिल्याच दिवशी दोन मुलांनी नोंदणीही केली आहे. नोंदणी झाल्यानंतर तातडीने लसीकरण केले जाणार आहे. 

Web Title: Corona vaccination: Registration for vaccination of children begins at Nair Hospital, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.