Corona vaccination: मुंबईत दिवसभरात एक हजार ९२६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 08:28 PM2021-01-16T20:28:50+5:302021-01-16T20:29:59+5:30

Corona vaccination Update : कोरोनावरील लसीकरणाच्या पहिल्या दिवशी चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस देण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले होते.

Corona vaccination: Vaccination of 1,926 medical staff in Mumbai Today | Corona vaccination: मुंबईत दिवसभरात एक हजार ९२६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण

Corona vaccination: मुंबईत दिवसभरात एक हजार ९२६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण

Next

मुंबई - कोरोनावरील लसीकरणाच्या पहिल्या दिवशी चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस देण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले होते. त्यानुसार पालिकेचे नऊ आणि राज्याच्या एका केंद्रांतून शनिवारी सकाळी लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. मात्र पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत एक हजार ९२६ जणांना लस देण्यात आली.

पहिल्या दिवशी लसीकरणाचा शुभारंभ झाल्यानंतर सर्व केद्रांवर लसीकरणाची कार्यवाही सुरु करण्यात आली. दुपारी उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, परळ येथील केईएम रुग्णालयात २४३, सायन १८८, नायर १९०, विलेपार्लेचे कूपर रुग्णालयात २६२, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात १४९, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालयात ८०, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालयात २८९, कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात २६६ आणि बीकेसी केंद्रात २२० तर जेजे रुग्णालयात ३९ जणांना लस देण्यात आली.

यांना मिळाली पहिली लस...
केईएम - उप अधिष्ठाता डॉ. मिलिंद नाडकर,
सायन - अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी,
नायर - अधिष्ठाता, पालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल
कूपर - माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत
वांद्रे - भाभा - वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे
व्ही. एन. देसाई - वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कारंथ
राजावाडी - वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर, कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय - वैद्यकीय अधिकारी ऋजूता बारस्कर
बीकेसी कोविड सुविधा केंद्र - आहारतज्ज्ञ डॉ. मधुरा पाटील.

Web Title: Corona vaccination: Vaccination of 1,926 medical staff in Mumbai Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.