corona vaccination : मुंबईत दोन महिन्यांत ४५ वर्षांवरील ४० लाख नागरिकांना देणार लस, ३१ मेपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 10:57 PM2021-03-24T22:57:16+5:302021-03-24T22:57:47+5:30
corona vaccination in Mumbai : कोविड १९ ला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला १ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यानुसार ४५ वर्षांवरील मुंबईतील ४० लाख नागरिकांना लस देण्यात येणार आहे.
मुंबई - कोविड १९ ला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला १ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यानुसार ४५ वर्षांवरील मुंबईतील ४० लाख नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणाचा हा टप्पा ३१ मे २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे लक्ष्य आहे. पावसाळ्यात लस घेण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. (Vaccination to be given to 40 lakh citizens above 45 years in two months in Mumbai , target to complete vaccination by May 31)
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रॉन्टलाईन वर्कर्स, १ मार्चपासून ज्येष्ठी नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. मात्र कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज तीन हजारांहून अधिक असल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने करण्यासाठी महापालिकेने केंद्र वाढविणे, खासगी रुग्णालयांची मदत घेणे अशी पालिकेची धावपळ सुरु आहे.
आतपर्यंत सुमारे दहा लाख लोकांना लस देण्यात आली आहे. १ एप्रिलपासून मुंबईतील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात होणार आहे. असे ४० लाख मुंबईकर आहेत.सध्या रुग्णांची संख्या वाढ असल्याने लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. यासाठी ३१ मे पर्यंत ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यासाठी काही केंद्रांमध्ये सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते ९ अशा दोन पाळ्यांमध्ये लसीकरण केले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.