Join us

Corona Vaccine: मुंबईत उद्या मिळणार केवळ दुसरा डोस; तिसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 7:53 PM

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत १८ वर्षांवरील ९५ लाख लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष्य आहे.

ठळक मुद्देमागील काही दिवसांमध्ये मुंबईतील रुग्ण संख्येत वाढ दिसून येत आहेपालिका लसीकरण केंद्रावर गुरुवार दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहितीदररोज एक लाख नागरिकांना लस देण्याचा निर्धार प्रशासनाने केला होता.

मुंबई - आतापर्यंत मुंबईतील ७९ टक्के लाभार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ३१ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी गुरुवारी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. मात्र या दिवशी कोणालाही पहिला डोस दिला जाणार नाही.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत १८ वर्षांवरील ९५ लाख लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष्य आहे. दररोज एक लाख नागरिकांना लस देण्याचा निर्धार प्रशासनाने केला होता. त्यानुसार दररोज सरासरी ८० हजार ते एक लाख नागरिकांना लस देण्यात येते. शासकीय, महापालिका रुग्णालये मिळून ३२० तर खासगी रुग्णालयात १३० अशी एकूण ४५० लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. १ मे २०२१ पासून १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. 

 ‘या’ ५ जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढली; तिसऱ्या लाटेपूर्वी धोक्याची घंटा?

दरम्यान कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ञांनी वर्तवला आहे. त्यानुसार मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील रुग्ण संख्येत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम वेगाने पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे. त्यानुसार सर्व शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रावर गुरुवार दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

१८ वर्षांवरील एकूण लाभार्थी - ९५ लाख

पहिला डोस घेतलेले - ७१ लाख २४ हजार ८२० (७९ टक्के) 

दुसरा डोस घेतलेले - २८ लाख ५० हजार ५५४ (३१ टक्के) 

दुसरी डोससाठी विशेष लसीकरण सत्र सर्वप्रथम  ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या  लसीकरण सत्रास नागरिकांचा उत्‍तम प्रतिसाद मिळाला. त्यादिवशी एक लाख ७९ हजार ९३८ लाभार्थ्‍यांना दुसरा डोस घेतला

टॅग्स :कोरोनाची लसमुंबई महानगरपालिका