Join us

कोरोनावरील लसी, औषधे पेटंटमुक्त असावीत; स्वदेशी जागरण मंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:07 AM

मुंबई : कोरोनावरील लसी व औषधे पेटंटमुक्त असावीत अशी मागणी स्वदेशी जागरण मंचच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी २० जून ...

मुंबई : कोरोनावरील लसी व औषधे पेटंटमुक्त असावीत अशी मागणी स्वदेशी जागरण मंचच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी २० जून हा दिवस स्वदेशी जागरण मंचच्यावतीने विश्व जागृती दिवस घोषित करण्यात आला आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात आणि जगभरातील काही भागांत दोन हजारांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन कोरोना प्रतिबंधक लसी व औषधे पेटंटमुक्त व्हावीत याकरिता आपले समर्थन नोंदवाव, असे आवाहन स्वदेशी जागरण मंचच्या राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अश्विनी महाजन यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

जगभरातील नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेबसाईटद्वारे प्लाकार्ड उपलब्ध करण्यात येणार आहे. जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी एक विश्व-एक स्वास्थ्य याकरिता सामूहिक जागतिक प्रयत्नांसाठी नवा मंत्र दिल्याबद्दल स्वदेशी जागरण मंचने त्यांचे अभिनंदन केले. सामूहिक जागतिक प्रयत्नातूनच कोरोनाचा सामना करणे शक्य आहे आणि हे केवळ ‘लोकशाही आणि पारदर्शी देशांद्वारेच होऊ शकते. अशावेळी सर्व देशांनी त्यांचे सर्व स्त्रोत हस्तांतरित करणे गरजेचे आहे. लसी आणि औषधे पेटंटमुक्त केलीत का हे सुनिश्चित करायला हवे. तसेच मंचच्यावतीने पंतप्रधानांना कोरोनाचे तंत्रज्ञान सामायिक करण्याचे आणि लस आणि औषधांसाठी कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.