Join us

Corona Vaccine: पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला द्या, मंत्री वडेट्टीवारांची केंद्र सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 3:31 PM

Vijay Wadettiwar On Corona Vaccine: राज्यात कोरोना विरोधी लसीचा तुटवडा निर्माण होऊन अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढावल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे.

Vijay Wadettiwar On Corona Vaccine: राज्यात कोरोना विरोधी लसीचा तुटवडा निर्माण होऊन अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढावल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. "राज्यात कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर होत चाचली आहे. देशातील ५० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस पुरवण्यापेक्षा आधी महाराष्ट्राला लस द्याव्यात", अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

राज्यात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

कोरोना विरोधी लसीच्या पुरवठ्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्राकडून लसीचा पुरवठा केला जात असला तरी त्याचा वेग अतिशय मंद असल्यानं आवश्यक लसींचा साठा नसल्याची टीका राज्य सराकरकडून केली जात आहे. केंद्राकडन केल्या जाणाऱ्या दुजाभावामुळे जनतेचे हाल होत असल्याची टीका सत्ताधारी करत आहेत. तर राज्यांच्या गरजेनुसार आणि लसीकरणाची क्षमता पाहून केंद्राकडून लसीचा पुरवठा सुरू आहे. यात महाराष्ट्रालाच सर्वाधिक लसीचा पुरवठा आजवर झाला आहे, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. 

तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनची मागणीराज्यात कडक निर्बंध लादण्यात आले असले तरी रुग्णसंख्या काही कमी होत नाही. त्यामुळे निर्बंधांनी काहीच होणार नाही. राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठकमहाराष्ट्रात कोरोना संक्रमणामुळे परिस्थिती भयंकर होऊ लागली आहे. दिवसाला राज्यात ५० हजारांपेक्षा कोरोना रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत घोषणा होऊ शकते. 

टॅग्स :विजय वडेट्टीवारकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेपाकिस्तान