Join us

Corona Virus: कोविड व्यवस्थापनासाठी १३०३ कोटी खर्च, मुंबई महापालिकेनं मांडला लेखाजोखा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 11:20 PM

कोविडचा प्रसार मुंबईत सुरू झाल्यापासून विविध उपाय योजना व वैद्यकीय खर्चावर महापालिकेला कोट्यावधी रुपये खर्च करावे लागले आहेत. यासाठी पालिकेने खात्यांमधून एक हजार ३८० कोटी रुपये राखून ठेवले होते

मुंबई - कोविड व्यवस्थापनासाठी महापालिकेने एक हजार ३०३ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तर आता आकस्मिक निधीतून तीनशे कोटी रुपये वळविण्यात येणार आहेत. वैद्यकीय उपचार, जंबो कोविड केंद्राची उभारणी यासाठी आलेल्या खर्चाचा लेखाजोखा प्रशासनाने अखेर स्थायी समितीपुढे मांडला आहे. 

कोविडचा प्रसार मुंबईत सुरू झाल्यापासून विविध उपाय योजना व वैद्यकीय खर्चावर महापालिकेला कोट्यावधी रुपये खर्च करावे लागले आहेत. यासाठी पालिकेने खात्यांमधून एक हजार ३८० कोटी रुपये राखून ठेवले होते. यापैकी एक हजार ३०३ कोटी रुपये खर्च नोव्हेंबर २०२१ पर्यंत करण्यात आला आहे. तर ४०० कोटी रुपयांचा निधी आकस्मिक निधीतून उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र कोविडचा प्रसार वाढल्याने आकस्मिक निधीतून ३०० कोटी रुपये वळविण्यात येणार आहेत. हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता असल्याने भूसंपदानासाठी राखून ठेवलेला निधी कोविडसाठी वापरण्यात येणार आहे. 

४० टन क्षमतेचे द्रवरुप ऑक्सिजन टँक 

मालाड जम्बो कोविड केंद्रात प्रत्येकी ४० टन क्षमतेचे द्रवरुप ऑक्सिजन टँक तयार केले आहेत. तसेच ४० ड्यूरा सिलेंडरही ठेवण्यात आले आहेत. हा ऑक्सिजन खाटापर्यंत पोहचविण्यासाठी पाईपलाईन सिस्टीम कार्यरत करण्यात येणार आहे. तसेच जंम्बो कोविड केंद्रासाठी अग्नि सुरक्षा प्रमाणपत्र मिळणे आवश्‍यक आहे. यासाठी तज्ञांच्या शिफारशीनुसार पालिका इलेेक्ट्रो मॅग्नेटिक सेन्सर सिस्टीम बसवणार आहे. त्यासाठी ८५ लाख रुपये खर्च होणार आहेत. यामुळे विद्युत वाहिन्या, विद्युत उपकरणात शॉर्टसर्किट होऊन लागणाऱ्या आगाची धोका कमी होणार आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिकामुंबई