Corona Virus: ४० रुग्ण क्वारंटाईन, १२ आयसोलेशनमध्ये; तपासणीची केंद्रे वाढवण्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 04:17 AM2020-03-13T04:17:41+5:302020-03-13T04:17:56+5:30
ज्या ठिकाणी वेगळे ठेवले जाते त्याला ‘आयसोलेशन’ विभाग म्हणतात. आपल्याकडे राज्यात असे १२ रुग्ण ‘आयसोलेशन’ मध्ये ठेवण्यात आले आहेत.
अतुल कुलकर्णी
मुंबई : राज्यातील सर्व १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘आयसोलेशन’ आणि ‘क्वारंटाईन’ कक्ष करण्यात आले आहेत. जर रुग्णांची संख्या वाढली तर ज्या भागात रुग्ण वाढतील त्या ठिकाणचे शासकीय हॉस्पिटल ताब्यात घेऊन गरजेनुसार रुग्णांची सोय केली जाईल, तशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी लोकमतला दिली.
आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यात ‘क्वारंटाईन’ करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या रुग्णांची तपासणी ‘पॉझिटीव्ह’ नाही पण त्यांना १४ दिवस वेगळे ठेवण्याची गरज आहे अशांना या ठिकाणी ठेवण्यात येत आहे. आज राज्यात असे ४० रुग्ण वेगळे करुन ठेवण्यात आले आहेत. ज्या रुग्णांचे तपासणी अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत.
ज्या ठिकाणी वेगळे ठेवले जाते त्याला ‘आयसोलेशन’ विभाग म्हणतात. आपल्याकडे राज्यात असे १२ रुग्ण ‘आयसोलेशन’ मध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यांना एचआयव्हीसाठीची दुसºया टप्प्यातील औषधे द्यायची की नाही याबद्दलच्या सूचना अद्याप केंद्र शासनाकडून आलेल्या नाहीत मात्र त्या रुग्णांना त्यांच्या शरीरात आढळणाºया चिन्हे आणि लक्षणानुसार उपचार दिले जात आहेत. आपल्याकडे दाखल असलेले ११ रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचेही डॉ. लहाने म्हणाले. रुग्णांच्या घशातून येणाºया लाळेची तपासणी यात केली जाते.
सध्या महाराष्ट्रात कस्तुरबा हॉस्पिटल(मुंबई), नॅशनल व्हायरल लॅबोरेटरी (पुणे) व इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज (नागपूर) या तीन ठिकाणी या तपासणीची अधिकृत व्यवस्था आहे. त्याशिवाय बी.जे. मेडिकल कॉलेज (पुणे), जे.जे. हॉस्पिटल, (मुंबई), हापकीन संस्था (मुंबई) या तीन ठिकाणी तपासण्या करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राज्य शासनाने केंद्राच्या आरोग्य विभागाकडे केल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.
कोणते हॅण्ड सॅनिटायझर वापरावे?
हे जंतू लाकडी दरवाजे, स्टिलचे साहित्य यावर साधारणपणे १० ते १२ तास जिवंत राहतात. आपण कळत न कळत रोज कितीतरी ठिकाणी हात लावतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट खाताना हात साबणाने धुवा, सतत शेकहॅण्ड करु नका, अल्कोहोल मिश्रित हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करा, कोणालाही मास्कची गरज नाही, जे उपचार करणारे आहेत किंवा गर्दी नियंत्रण करणारे आहेत त्यांना मास्कची आवश्यकता असल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.
हात तोंडावर फिरवावा की नाही?
जेवणात प्रोटीनचा पुरेश्या प्रमाणात वापर करा, दिवसातून किमान ३ लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. गरज नसताना सतत आपलेच हात तोंडावरुन फिरवणे, नाकात बोट घालणे, डोळे चोळणे अशा गोष्टी टाळाव्यात. कारण आपला चेहरा, ओठाच्या आतली बाजू, डोळ्यांच्या
आतली बाजू संवेदनशील असते. त्याद्वारे जंतूचा संसर्ग होऊ शकतो.
शिंकताना आणि खोकताना काय कराल?
शिंकेमुळे अथवा खोकण्यामुळे जे थेंब आपल्या तोंडातून बाहेर पडतात त्याद्वारे हे विषाणू बाहेर पडतात. ते जर तुमच्या हातावर बसले आणि तेच हात जर आपण चेहºयावर फिरवले तर याची लागण होऊ शकते. त्यामुळे शिंकताना किंवा खोकताना तोंडासमोर, नाकासमोर रुमाल धरा, तो रुमाल नंतर घडी घालून खिशात ठेवा. शिंका किंवा खोकला जास्त येत असेल तर रुमाल त्यानुसार बदला. एका वेळी एकच टीश्यू पेपर वापरा, तोच तो टीश्यू पेपर पुन्हा पुन्हा वापरु नका, असेही डॉ. लहाने यांनी सांगितले.