Corona Virus: ‘साबणाने स्वच्छ हात धुऊन घ्या; सॅनिटायझरवर विसंबून राहू नका’ कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 04:35 AM2020-03-13T04:35:28+5:302020-03-13T06:37:06+5:30

कोरोना साथीचा प्रसार रोखण्याच्या प्रतिबंधक उपायांचा एक भाग म्हणून मुंबई उच्च न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक वकिलाची, पक्षकाराची व इतरांचीही तपासणी केल्यावरच त्यांना आत प्रवेश देण्याचे प्रशासनाने ठरविले आहे.

Corona Virus: 'Clean hands with soap; Don't rely on sanitizer ' | Corona Virus: ‘साबणाने स्वच्छ हात धुऊन घ्या; सॅनिटायझरवर विसंबून राहू नका’ कारण...

Corona Virus: ‘साबणाने स्वच्छ हात धुऊन घ्या; सॅनिटायझरवर विसंबून राहू नका’ कारण...

Next

कोरोना विषाणू हा ४००-५०० एम साईजचा असतो. एखादा संसर्गबाधित रुग्ण तुमच्या जवळ शिंकला तर तो विषाणू जमिनीवर ३ मीटर (१० फूट) अंतरावर पडतो.

हा विषाणू धातूवर पडल्यास १२ तासांपर्यंत जिवंत राहू शकतो. म्हणून जर तुमचा कुठल्याही धातूशी संपर्क आल्यास साबणाने स्वच्छ हात धुऊन घ्यावेत. सॅनिटायझरवर विसंबून राहू नका.

कपड्यावर हा विषाणू ६ ते १२ तासांपर्यंत जिवंत राहू शकतो. साधा डिटर्जेंट त्याला मारू शकतो. कपडे रोज धुवायची गरज नाही. ते तुम्ही उन्हात ४ तास ठेवल्यास विषाणू मरतो.

सर्वांत आधी विषाणू घशाला संसर्ग करतो. सदर सुका घसा खवखवणे ३ ते ४ दिवस राहते. नंतर विषाणू नासिकेतील द्रव्यात मिसळून श्वासनलिकेतून फुप्फुसात शिरतो व न्यूमोनियानंतर खूप ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक बंद होणे, पाण्यात बुडताना वाटते तशी परिस्थिती होते. त्या वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या आहेत.

हायकोर्टातही होणार तपासणी
कोरोना साथीचा प्रसार रोखण्याच्या प्रतिबंधक उपायांचा एक भाग म्हणून मुंबई उच्च न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक वकिलाची, पक्षकाराची व इतरांचीही तपासणी केल्यावरच त्यांना आत प्रवेश देण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. त्यानुसार न्यायालय आवारातील प्रवेशद्वारांवर असलेल्या तपासणी केंद्रांवर ‘टेंपरेचर गन’ने आत येणाºयाच्या अंगात ताप नाही ना? याची तपासणी केली जाईल. ताप असलेल्यांची पुढील तपासणी केली जाईल. न्यायालयाच्या मूळ शाखेवरील बॉम्बे बार असोसिएशनने यासंबंधी काही सूचना प्रशासनास केल्या होत्या. त्या मान्य करून त्यानुसार उपाययोजना करण्याचे न्यायालय प्रशासनाने मान्य केल्याचे असोसिएशनने त्यांच्या नोटीस बोर्डावर लावलेल्या नोटीसीत नमूद आहे.

या सूचना पाळणे बंधनकारक
न्यायालयाने हजर राहणे सक्तीचे केले असेल तरच पक्षकारांनी न्यायालयात यावे, अन्यथा येऊ नये.
तुरुंगात असलेली व्यक्ती हजर राहू शकली नाही म्हणून तिची केस फेटाळण्यात येणार नाही.
वकिलांनी फेसमास्क वापरावा व हात सॅनिटायझरने धुवावेत.
परस्परांशी हस्तांदोलन करू नये.
पक्षकारांनी अगदीच निकडीचे असल्याशिवाय वकिलांना भेटण्यास कोर्टात येऊ नये.

Web Title: Corona Virus: 'Clean hands with soap; Don't rely on sanitizer '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.