Corona Virus: राज्यात पाच जण निरीक्षणाखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 04:45 IST2020-02-28T04:44:43+5:302020-02-28T04:45:13+5:30
आतापर्यंत ९३ जणांना घरी सोडले

Corona Virus: राज्यात पाच जण निरीक्षणाखाली
मुंबई : कोरोना विषाणूच्या (कोविड - १९) पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत आलेल्या ४५८ विमानांमधील ५५ हजार ७८५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. तर, भरती झालेल्या ९८ प्रवाशांपैकी ९३ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या तीन जण पुणे येथे तर दोघे मुंबईत भरती आहेत. अशा प्रकारे राज्यात एकूण पाच जण निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द. कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या १० देशांतील प्रवाशांसोबतच आता इराण आणि इटली या देशांतील प्रवाशांचीही विमानतळावर तपासणी केली जात आहे. राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांत ९८ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ९५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन. आय. व्ही. पुणे यांनी दिला आहे.