Corona Virus : मुंबईतल्या १५ ते २० हजार एटीएममध्ये घेतली जाते आरोग्याची काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 01:40 PM2020-08-16T13:40:34+5:302020-08-16T13:41:24+5:30
एटीएमसोबत बँकामध्येही आरोग्याची काळजी घेतली.
मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात बँकाच्या २५ हजार शाखांचे जाळे असून, त्यानुसार असलेल्या १५ ते २० हजार एटीएम सेंटरमध्ये कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्याची काळजी घेतली जात आहे. एटीएमसोबतबँकामध्येही आरोग्याची काळजी घेतली जात असून, सामाजिक अंतर पाळणे आणि केंद्रासोबत महापालिकेने दिलेल्या सुचना बँकांसह एटीएममध्ये प्रदर्शित केल्या जात आहेत. विशेषत: सॅनिटायझर्सचा वापर करत अधिकाधिक स्वच्छत ठेवण्यावर भर दिला जात आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रत्येक जण कार्यरत आहेत. अधिकाधिक स्वच्छता ठेवली जात आहे. विशेषत: बँकांसारखा जो घटक आहेत; जेथे ग्राहक मोठया प्रमाणावर येतात. लोकांचा एकमेकांशी संपर्क येतो. एटीएममध्ये मोठया प्रमाणावर ग्राहक येतात. अशावेळी येथे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून एटीएममध्ये स्वच्छता ठेवण्यासह सॅनिटायझर्स देखील ठेवले जात आहे. काही ठिकाणी अडचणी असल्या तरी त्यावर देखील मात केली जात आहे. बँकेचे जे सुरक्षा रक्षक आहेत ते सगळीकडे असतील, अशातला भाग नाही. निम्म्या ठिकाणी ते असतील. किंवा नसतील. मात्र तेथेही अधिकाधिक स्वच्छता ठेवण्यावर बँकाचा भर आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात एकूण १५ हजार २० हजार एटीएम सेंटर आहेत. बँकाना एटीएममध्ये रोजच्या रोज रोख रक्कम भरावी लागते. सहकारी, राष्ट्रीयकृत, खासगी बँक असली तरी त्यांना रोख रक्कम भरण्याची आवश्यक असते. ज्या प्रमाणे रोख रक्कम भरली जाते त्याप्रमाणे एटीएम स्वच्छ आहे की नाही? हे देखील पाहिले जाते. ग्राहकांकरिता नोटीस लावली जाते. येथे सॅनिटायझर्स ठेवले जातात. स्वच्छता ठेवणे हे सर्व बँकांना करावे लागते. अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक असतात. आणि सुरक्षा रक्षक देखील काळजी घेतात. ग्राहक रांगेत येतो आहे की नाही. सामाजिक अंतर पाळले जाते आहे की नाही. गर्दी कमी होईल. एटीएममध्ये एकावेळी एकच माणूस जाईल. मोठे एटीएम असेल तर दोनच ग्राहक जातील, याची काळजी घेतली जाते. आणि जेथे सुरक्षा रक्षक नाहीत तेथे ग्राहक स्वत: काळजी घेतो. केंद्राने आणि महापालिकेने दिलेल्या सुचना पाळल्या जातात. एटीएम सेंटर आणि बँकाबाहेर आरोग्याची काळजी घेण्याबाबतच्या सुचना दिलेल्या असतात.
........................
मुंबईत जे पंधरा ते वीस हजार एटीएम आहेत. तेथे आरोग्याची काळजी घेतली जाते. बँकेतही काळजी घेतली जाते. आरोग्याची काळजी घेणारे सर्व पोस्टर्स लावले आहेत. सामाजिक अंतर पाळले जात आहे. कुचराई केली जात नाही. ग्राहक देखील आरोग्याची काळजी घेतात. सूचनेचे पालन करतात.
- विश्वास उटगी, बँकिंग तज्ज्ञ