Corona Virus: लोकल, एक्स्प्रेसच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह; २०० पेक्षा जास्त रेल्वे कर्मचाऱ्याना प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 04:38 AM2020-03-13T04:38:03+5:302020-03-13T04:38:31+5:30

रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्युब याद्वारे जनजागृती केली जात आहे. लोकल आणि रेल्वे स्थानकात कोरोनाविषयी खबरदारी बाळगण्याची उद्घोषणा केली जात आहे.

Corona Virus: Local, Express Cleanliness Questionnaire; Training of more than 4 railway employees | Corona Virus: लोकल, एक्स्प्रेसच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह; २०० पेक्षा जास्त रेल्वे कर्मचाऱ्याना प्रशिक्षण

Corona Virus: लोकल, एक्स्प्रेसच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह; २०० पेक्षा जास्त रेल्वे कर्मचाऱ्याना प्रशिक्षण

Next

मुंबई : रेल्वे प्रशासन कोरोनाबाबत जनजागृती करत असले तरी स्वच्छतेच्या बाबतीत पिछाडीवर आहे. लोकल, एक्स्प्रेस यांची स्वच्छता योग्य प्रकारे केली जात नाही. त्यामुळे धातूवर १२ तास जगणाऱ्या कोरोना विषाणूची बाधा प्रवाशांना होण्याची भीती आहे.

रेल्वे प्रशासनाकडून लोकल आणि एक्स्प्रेसची जंतुनाशक औषधाद्वारे फवारणी केली जात नाही. मुंबईत दाखल होणाºया एक्स्प्रेसमधील प्रवाशांची तपासणी केली जात नाही. लोकल, एक्स्प्रेसची स्वच्छता करण्यासाठी सामान्य धुण्याच्या पावडरीचा वापर केला जातो. परिणामी, लोकल, एक्स्प्रेसद्वारे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली.

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल तीन दिवसांतून एकदा धुतली जाते. यासह एक्स्प्रेसची स्वच्छता करण्यास हलक्या दर्जाची पावडर वापरली जाते. कंत्राटदाराकडून एक्स्प्रेसमध्ये काम करणाºया कर्मचाऱ्यांना अनेक कामे दिली जातात. यामध्ये शौचालयाची साफसफाई करणाºया कर्मचाºयालाच प्रवाशांना खाद्यपदार्थ पुरविण्याचे, बेडशिट टाकण्याचे काम दिले जाते. कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची काळजी घेतली जात नाही, अशी प्रतिक्रिया सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे उपाध्यक्ष अमित भटनागर यांनी दिली.

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे सोशल मीडिया, उद्घोषणा, फलक याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. सोबतच प्रवाशांनी कशा प्रकारे दक्षता घ्यावी याची माहिती देण्यासाठी २०० पेक्षा जास्त रेल्वे कर्मचाºयांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच रेल्वेच्या ६ रुग्णालयांत विशेष खाटांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रेल्वे मंडळाकडून मिळालेल्या सूचनेनुसार मध्य रेल्वेच्या नियंत्रण कक्ष, रेल्वे स्थानकावरील कर्मचारी वर्ग यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येकाला जबाबदारी देऊन कोरोनाग्रस्त संशयित रुग्ण आढळल्यास तत्काळ जवळील रुग्णालयात त्याला न्यावे, अशा सूचना मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्युब याद्वारे जनजागृती केली जात आहे. लोकल आणि रेल्वे स्थानकात कोरोनाविषयी खबरदारी बाळगण्याची उद्घोषणा केली जात आहे. यासह प्रत्येक लोकल आणि रेल्वे स्थानकात जनजागृतीबाबत फलक लावण्यात आले आहेत.

मध्य रेल्वे विभागाअंतर्गत एकूण सहा रुग्णालये आहेत. भायखळा, कल्याण, भुसावळ, सोलापूर, नागपूर आणि पुणे येथील रुग्णालयात विशेष बेडची सुविधा पुरविण्यात आली आहे. रेल्वे प्रवासात कोरोना संशयित रुग्ण आढळून आल्यास, त्यांना तत्काळ मध्य रेल्वेच्या रुग्णालयात नेण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.

Web Title: Corona Virus: Local, Express Cleanliness Questionnaire; Training of more than 4 railway employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.