मुंबई : कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून येत असून मृत्यूचा आकडाही मुंबईतच जास्त आहे.
आज मुंबईत ७२२ नवे रुग्ण सापडले असून ६५२ संभाव्य कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर दिवसभरात २७ जणांचा मृत्यू झाला असून २०३ जण बरे झाले आहेत. दरम्यान, मुंबईत एकूण १४४०१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर १२६८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण २७९२ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ४८९ जणांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दोन हजारांचा टप्पा पार केला असून जिल्ह्यात शनिवारी नवे 184 रुग्णांची नोंद झाली आहेत. या नव्या रुग्णांनी जिल्ह्यातील रुग्णांची 2006 झाली आहे.तसेच तिघांच्या मृत्यूने मृतांची संख्या ही 49 वर पोहोचली आहे. 24 तासात नवीमुंबईत सर्वाधिक 65 नवे रुग्ण मिळून आले असून भिवंडीत एक ही नवा रुग्ण नोंदवला गेला नाही. दुसरीकडे कल्याण- डोंबिवली महापालिकेने तिनशेचा आकडा पार केल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी आता मोदींना साकडे; 1 कोटी पत्रं पाठविणार
इराण सौदी अरेबियावर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकणार; तेलावरून वाजल्याने अमेरिकेने सुरक्षा काढली
महाराष्ट्र एसटीने मजुरांना सोडेल, पण मोदींनी मध्यस्थी करावी; शरद पवारांचे आवाहन
अमित शहा अत्यवस्थ? खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच गायब असण्याचे सांगितले कारण