Join us

Corona Virus : ७३ टक्क्यांहून अधिक लघु आणि मध्यम उद्योग पुन्हा उभारी घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 5:58 PM

कोरोनाचा फटका लघु आणि मध्यम उद्योगास देखील बसला.

ठळक मुद्दे७३% लघु आणि मध्यम उद्योगांना प्रगती करण्याबद्दल विश्वास६४% लघु आणि मध्यम उद्योगांना वाटते की व्यावसायिक धोरणांना नवे स्वरूप देण्याची संधी७५% लघु आणि मध्यम उद्योगांच्या मते डिजिटल व्यवहारांचा स्वीकार यशाची गुरुकिल्ली

मुंबई : कोरोनाचा फटका देशातील लघु आणि मध्यम उद्योगास देखील बसला असून आता हळुवार का होईना हे क्षेत्र पुन्हा एकदा नव्याने उभारी घेण्याच्या तयारीत आहे. देशभरातील ७३ टक्क्यांहून अधिक लघु आणि मध्यम उद्योग ते कोविड-१९ च्या संकटात टिकून राहातील आणि पुन्हा उभारी घेतील, असा विश्वास आशिया लघु आणि मध्यम उद्योग २०२० या अहवालातून हा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. १६०० लघु आणि मध्यम उद्योगांनी यासाठीच्या सर्वेक्षणात भाग घेतला. २६ मे ते ७ जून २०२० या काळात या सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक बाजारपेठेतील २०० सहभागींच्या मुलाखती घेण्यात आल्या. रिटेल/होलसेल, उत्पादन, प्रोफेशनल सर्विसेस, हेल्थकेअर, शिक्षण आणि वित्त सेवा अशा विविध क्षेत्रांचा यात समावेश होता.

जीडीपीमध्ये लघु आणि मध्यम उद्योगांचा सुमारे एक तृतीयांश वाटा आहे. लाखो लोकांना रोजगार मिळवून देणारे हे क्षेत्र आहे.आता बदलणाऱ्या व्यवसाय पद्धती आणि ग्राहकांच्या गरजांनुरुप बदल करण्याची क्षमता यामुळे ते फार कमी वेळात पुन्हा उभारी घेऊ शकतात. सुमारे ६४% लघु आणि मध्यम उद्योगांच्या मते या काळाने त्यांच्या व्यावसायिक धोरणांना नवे स्वरूप देण्याची एक चांगली संधी दिली आहे. ५० टक्के लघु आणि मध्यम उद्योगांच्या मते हे संकट दीर्घकाळात अधिक चांगल्या संधी आणणार आहे. व्यवसायाला पुनरुज्जीवित करण्यासाठी डिजिटल मार्ग अवलंबण्याचे महत्त्व लघु आणि मध्यम उद्योगांना पटले आहे.७५% लघु आणि मध्यम उद्योगांना विश्वास आहे की, त्यांच्या यशासाठी डिजिटल व्यवहारांचा अवलंब आवश्यक किंवा अत्यंत महत्त्वाचा आहे. दरम्यान, मागील वर्षात ज्या लघु आणि मध्यम उद्योगांनी प्रगती केली त्यातील ५६ टक्के कंपन्यांना डिजिटल व्यवहारांनी चालना दिली. फक्त १४ टक्के लघु आणि मध्यम उद्योगांनी या मुद्द्याला कमी महत्त्व दिले.

उभारी घेण्यासाठी किती उद्योगास काय वाटते (टक्क्यांत)ऑनलाईन टूल्सचा वापर ३४कामाचे लवचिक पर्याय ३३धोरणाबाबत सल्ला ३२कामात कल्पकता २८

आव्हाने (टक्क्यांत)जागतिक अस्थिरता ३८पुरेसा रोकड प्रवाह ३८अर्थपुरवठयाची उपलब्धता २०डिजिटलचा वापर १९ 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमहाराष्ट्रभारत