मुंबई: राज्यात शनिवारी कोरोना (कोविड - 19) आजाराच्या चौदा नवीन रुग्णांची नोंद झाली. तसेच औरंगाबाद येथील 59 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. रशिया व कझाकिस्तानचा प्रवास करून ती भारतात परतली आहे. सध्या औरंगाबादेतल्या धूत रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यामुळे राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 32 झाली आहे. तसचे मुंबईत देखील 5 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमिवर कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पर्यटक संस्थांनी टूर आयोजित न करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसचे या आदेशाचे पालन न केल्यास कलम 144 अंतर्गत कारवाई करू असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.
कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी 'मुंबई दर्शन'सारखे व्यावसायिक पर्यटन 31 मार्चपर्यत बंद करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचं उल्लंघन करत कोणत्याही पर्यटक संस्थांनी टूर आयोजित केल्यास 144 (जमावबंदी कायद्यानुसार) कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. तसेच मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना केलं आहे.
राज्यात शनिवारी 131 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. सध्या 14 जण पुणे येथे, तर 72 जण मुंबईत भरती आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 16, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे नऊ आणि वायसीएम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथे तीन संशयित रुग्ण भरती आहेत.
कोरोना साथीची लागण झालेल्या देशभरातील रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील आकडा शनिवारी सर्वाधिक होऊन ३१ पर्यंत पोहोचल्यानंतर राज्य सरकारने या घातक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीचे प्रतिबंधक उपायही अधिक कडक केले. त्यानुसार राज्यातील शहरांमधील शाळा, कोचिंग क्लासेस, अंगणवाड्या व महाविद्यालये येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जेथे गर्दी जमा होते असे कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यास राज्यभर बंदी घालण्यात आली असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या मोठ्या शहरांमधील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा व तरणतलावही महिनाअखेरपर्यंत बंद करण्यात आले आहेत.
Coronavirus : शहरांमधील शाळा, कॉलेज, मॉल्स, कोचिंग क्लास ३१ मार्चपर्यंत बंद, प्रतिबंधासाठी कडक उपाय
Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले पाच नवे कोरोनाबाधित, राज्यातील रुग्णांची संख्या 31 वरCoronavirus : चीनहून परतलेली विद्यार्थिनी थेट पोहोचली रुग्णालयात; डॉक्टरांनी खुर्ची सोडून ठोकली धूम
Coronavirus : देशात 100हून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण; भारतानं पाच देशांच्या सीमा केल्या बंद