Join us

Corona virus : रेमेडिसीवीर हे जीवनरक्षक औषध नाही, डॉक्टर अमोल कोल्हेंनी सूचवला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 4:07 PM

शासन व प्रशासन रेमडिसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु सातत्याने वाढती रुग्णसंख्येमुळे याला मर्यादा येत आहेत.

ठळक मुद्देशासन व प्रशासन रेमडिसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु सातत्याने वाढती रुग्णसंख्येमुळे याला मर्यादा येत आहेत.

मुंबई - राज्यातील कोविड 19 रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णालयात रुग्णांसह नातेवाईकांचेही प्रचंड हाल होत आहेत. त्यातच, ऑक्जिसन बेड आणि रेमेडिसीवीरच्या इंजेक्शनसाठी रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुण्यात रेमेडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. त्या, पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी नागरिकांना आवाहन केलंय. तसेच, रेमेडिसीवीर हे जीवनरक्षक औषध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं असून पर्यायी औषधही सूचवले आहे. 

शासन व प्रशासन रेमडिसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु सातत्याने वाढती रुग्णसंख्येमुळे याला मर्यादा येत आहेत. हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचविलेली औषधे रुग्णांना देता येतील. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. त्यामुळे ते रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. यासोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरुन गरज असणाऱ्या रुग्णांनाच हे इंजेक्शन दिले जावे अशी माझी नम्र विनंती आहे, असे ट्वि डॉ. अमोल कोल्हे यांनी केलंय. 

महाराष्ट्रातील टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी एक गोष्ट वारंवार सांगितली आहे. रेमडिसीवीर हे जीनवरक्षक औषध नाही. रेमडिसीवीरमुळे शरीरातील विषाणूचा व्हायरल लोड कमी होऊ शकतो, पण रेमडिसीवीरमुळे रुग्णाचा जीव वाचतो, असे नाही. रुग्णलयातील रुग्णाचा मुक्काम काही काळ कमी होईल, पण हे इंजेक्शन जीवनरक्षक नाही, असे अमोल कोल्हे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. 

रेमडिसिवीरच्या वापराबाबत कोविड टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात एक महत्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय पण ते आता मिळत नाही. या परिस्थितीत काय करावे?, यासंदर्भात आलेल्या प्रश्नावर डॉ. कोल्हे यांनी पर्याय सूचवला आहे. जर रुग्ण तोंडावाटे औषध घेत असेल, ओरव्ल इंजेक्शन घेण्यास तो सक्षम असेल तर रेमेडिसीवीर उपलब्ध होईपर्यंत रुग्णाला तोंडावाटे फेव्हीपॅरावीर औषध द्यावेत, असा पर्याय डॉक्टर कोल्हे यांनी सांगितला आहे. तसेच, महाराष्ट्रात फेव्हीपॅरावीरचा साठा उपलब्ध असल्याचेही कोल्हे यांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसडॉक्टरडॉ अमोल कोल्हे