Join us

Corona Virus: "अजून लॉकडाऊनची वेळ आलेली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 7:03 AM

Corona Virus: दोन ते तीन टक्के रुग्णच दाटीवाटीच्या वस्तीत राहणारे  - सुरेश काकाणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत असल्याने लॉकडाऊनची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ९७ टक्के रुग्ण हे इमारतीत राहणारे असून केवळ दोन ते तीन टक्के लोक हे दाटीवाटीच्या वस्तीत राहतात. त्यामुळे सध्या लॉकडाऊनची वेळ आपल्यावर येईल असे वाटत नाही, असे मत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केले आहे.

गेेल्या महिन्यापासून मुंबईत काेराेनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. गुरुवारी देखील ११०३ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे चिंता  व्यक्त होत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी चेंबूर, अंधेरी पश्चिम, वांद्रे पश्चिम, कांदिवली, बोरवली आदी विभागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सध्यातरी लाॅकडाऊनची वेळ आलेली नाही. परिस्थिती नियंत्रणात असून विविध  उपाययाेजना पालिका प्रशासनाकडून राबवण्यात येत असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, मुंबईत २५ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंतचा कोरोना वाढीचा दर हा ०.२९ टक्के इतका आहे. तर मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९३ टक्के इतका असल्याचे समाेर आले आहे.

३ मार्चपर्यंत मुंबईत ३३ लाख ५३ हजार १२४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत १४ ॲक्टिव्ह कटेंन्टमेन झोन असल्याचे समाेर आले असून काेराेनाच्या पार्श्वभूमीवर एकूण १८५ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

लसीकरणातील गोंधळ टाळण्यास प्रयत्नशीलगर्दी टाळण्यासाठी मुंबईत २९ खाजगी रुग्णालयाला केंद्र सरकारने लसीकरणाची परवानगी दिली आहे.  महापालिकेच्या २३ आणि १६ खासगी रुग्णालयात लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. नागरिकांनी आधी नोंदणी करावी आणि नंतर केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन काकाणी यांनी केले. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्या