Corona Virus: ओला, उबर चालकांचे ७० टक्के नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 02:41 AM2020-03-14T02:41:11+5:302020-03-14T02:42:02+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मुंबई : कोरोनामुळे मुंबईत परदेशांतून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे, शिवाय एका चालकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रवासी ओला, उबर टॅक्सीमध्ये बसण्याचे टाळत आहेत. त्यामुळे ओला, उबर चालकांना ७० टक्के नुकसान झाले आहे, अशी माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वाहतूक विभागाचे प्रमुख सुनील बोरकर यांनी दिली.
बोरकर म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. ओला, उबर चालकांना विमानतळावर जास्त मागणी होती, परंतु पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याने चालकांचे नुकसान झाले आहे. कोरोनाला घाबरून अनेक जण घराबाहेर पडणे, प्रवास करणे टाळत आहेत. त्यामुळे व्यवसायावर ७० टक्के परिणाम झाला आहे.
अशी घ्यावी काळजी
चालकांनी मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर वापरावे.
पैसे देताना, घेताना प्रवाशांनाही सॅनिटायझर वापरायला द्यावे.
गाडीमध्ये स्वच्छता ठेवावी, तसेच प्रवासी कोठून आला याची नोंद ठेवावी.
एखादा प्रवासी संशयित आढळल्यास त्याची माहिती नियंत्रण कक्षाला द्यावी, असे बोरकर म्हणाले.