कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत लढणाऱ्या कोरोना योद्धा रमेश नांगरे यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:08 AM2021-03-13T04:08:14+5:302021-03-13T04:08:14+5:30
दोन दिवसांपूर्वीच घेतली होती लस.. दोन दिवसांपूर्वीच घेतली होती लस.. लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आशिया खंडातील सर्वांत मोठी ...
दोन दिवसांपूर्वीच घेतली होती लस..
दोन दिवसांपूर्वीच घेतली होती लस..
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी परिसरात कोरोनाच्या महामारीत रस्त्यावर उतरून लढणारे कोरोना योद्धा रमेश बाबूराव नांगरे (५४) यांचा गुरुवारी ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ते साकीनाका विभागाचे सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला म्हणून सर्वांनाच धक्का बसला आहे.
बोरिवली परिसरात पत्नी आणि तीन मुलांसोबत ते राहण्यास होते. दोन महिन्यांपासून पदोन्नतीने साकीनाका विभागाची सहायक पोलीस आयुक्तपदाची धुरा त्यांच्या हातात देण्यात आली होती. बुधवारी रात्रपाळी करून घरी आले होते. अशात गुरुवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांसह पोलीस दलाला धक्का बसला आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात धारावीत पहिला कोरोनाचा बळी गेल्यानंतर तेथील परिसरात तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशात ते स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थिती हाताळत होते. अवघ्या २०० पोलिसांच्या मनुष्यळाच्या मदतीने त्यांनी तेथील परिस्थितीवर नियंत्रण आणले. सर्व बाजार बंद करून मोठ्या मैदानात एकच सूट सुटीत बाजार पेठ तयार केली. त्यांच्या या प्रयत्नामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत झाली. बोलक्या ड्रोनद्वारे त्यांनी परिसरात फिरून दिवस रात्र एक करून जनजागृती केली.
अशात मंजुरांच्या स्थलांतरादरम्यानही त्यांनी चोखपणे सर्व परिस्थिती हाताळली आहे. त्यांच्या योग्य नियोजनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात त्यांचे मोठे यश आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सत्कार केला. तसेच नॅशनल जिओग्राफिक वाहिनीने त्यांच्यावरदेखील डॉक्युमेंटरी तयार केली
होती. तसेच वरिष्ठाकडूनही वेळोवेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुटुंबीयांनी नोकरी सोडून गावी जाण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी मात्र नकार देत, अशी संधी कधी तरी मिळते, ज्यातून केलेल्या कामाचा अभिमान वाटतो.'' असे सांगून त्यांचे काम सुरू ठेवले होते. पोलीस दलात ते सर्वांचेच जवळचे होते.
...........
दोन दिवसांपूर्वीच घेतली होती लस
दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
....