गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे कोरोना योद्ध्यांचा राजभवनात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:04 AM2021-01-01T04:04:52+5:302021-01-01T04:04:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाबाधित रुग्ण व गरजूंची सेवा गणेशसेवेपेक्षाही मोठे कार्य आहे. त्याकरिता कोरोना योद्ध्यांना निश्चित दुप्पट ...

Corona warriors felicitated at Raj Bhavan by Ganeshotsav Coordinating Committee | गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे कोरोना योद्ध्यांचा राजभवनात सत्कार

गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे कोरोना योद्ध्यांचा राजभवनात सत्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाबाधित रुग्ण व गरजूंची सेवा गणेशसेवेपेक्षाही मोठे कार्य आहे. त्याकरिता कोरोना योद्ध्यांना निश्चित दुप्पट पुण्य लाभेल, या शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी कोरोना योद्ध्यांना कौतुकाची थाप दिली.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने राजभवन येथे गुरुवारी ५० कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार आशीष शेलार व समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहीबावकर यावेळी उपस्थित होते.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीने ‘कोविड कृती दल’ स्थापन करून गणेश मंडळांच्या ४५० कार्यकर्त्यांमार्फत रक्तदान शिबिरे, योगसाधना, जंतुनाशक फवारणी, मास्क वाटप, स्यानिटायझर्स वाटप, भोजनदान अन्नधान्य वाटप, पोलिसांसाठी चहा - नाश्त्याची सोय यांसारखे उपक्रम राबविल्याबद्दल समितीचे कौतुक केले.

Web Title: Corona warriors felicitated at Raj Bhavan by Ganeshotsav Coordinating Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.