कोरोना : आपल्याला लोकांचे जीव वाचवायचे आहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:06 AM2021-04-14T04:06:07+5:302021-04-14T04:06:07+5:30
मुंबई : उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमीच समाजमाध्यमांवर क्रियाशील असतात. आपल्या ट्वीटच्या माध्यमातून ते फोटो, व्हिडिओ आणि मेसेज शेअर ...
मुंबई : उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमीच समाजमाध्यमांवर क्रियाशील असतात. आपल्या ट्वीटच्या माध्यमातून ते फोटो, व्हिडिओ आणि मेसेज शेअर करत असतात. शिवाय विविध दाखले आपण अडचणींवर कशी मात करता येईल? याबाबत माहिती देत असतात. रविवारीदेखील त्यांनी कोरोना, उपचार आणि उपलब्ध खाटांबाबत एक संदेश दिला असून, आपल्याला कोरोनाच्या काळात लोकांचे जीव वाचवायचे आहेत, असे त्यांनी यात म्हटले आहे.
मुंबईतील बहुतेक कोविड प्रकरणे उच्चवर्गातील आहेत आणि अनेक जण उपचारासाठी जंबो सेंटर आणि जनरल वाॅर्डात दाखल होणे पसंद करत नाहीत. मात्र, त्यामुळे खाटा उपलब्ध होणार नाहीत, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. आपल्याला कोरोनाच्या काळात लोकांचे जीव वाचवायचे आहेत. आपल्याला आरोग्य क्षेत्रातील पायभूत सेवा-सुविधांवर भर द्यायचा आहे आणि ज्यांना या सेवा परवडतात त्यांना प्राधान्य द्यावे लागेल. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी कोविड आयसीयू बेड त्वरित उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सध्या उपचारासाठी उपलब्ध असलेले बेड कमी न करता उपचार करण्याची अत्यंत गरज आहे. असे केले तर गरजूंना आपण वेळेत उपचार देऊ शकतो. शिवाय महापालिकेचा पैसादेखील वाचवू शकतो.