मुंबई - जगभरात कोरोना व्हायरस पसरला असून, याबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी व नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सर्वच स्तरातून पुढाकार घेतला जात आहे. सोशल मीडियाही यात मागे नाही. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जोक्स व्हायरल होत आहेत. त्यातच, रस्ते अपघातासंदर्भातील एक मेसेजही व्हायरला झाला होता. आता, कोल्हापूरपोलिसांनीही एक मेसेज करून सकारात्मक संदेश दिला आहे.
कोरोना व्हायरसचा धोका देशात वाढताना पाहायला मिळत आहे. बुधवारी सकाळपर्यंत भारतात कोरोना रुग्णांची संख्या 60 वर पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांत या घटनांमध्ये वाढ झाली असून सर्वात जास्त परिणाम केरळमध्ये दिसून येत आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला असून, आतापर्यंत 11 रुग्ण आढळून आली आहे. त्यामुळे परिस्थती लक्षात घेऊन सरकारने मास्क आणि हँण्ड वॉश हे रेशन दुकानातून अल्प दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोरोनामुळे मास्क विकत घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. त्यामुळेच, 20 रुपयांचा मास्क तब्बल 100 रुपयांना विकला जात असल्याचे सांगण्यात येते. आता, कोल्हापूरपोलिसांनी मास्कवरुनच एक मेसेज ट्विट केलाय. कोल्हापूर पोलिसांचे हे ट्विट चांगलच व्हायरल झाला आहे.
कोरोनाने एक व्यक्ती मयत झाला तर हजारोंनी मास्क घेतले...अपघाताने दररोज 600 लोक मरतात..कोणीच नाही जात हेल्मेट घ्यायला...का???असे ट्विट कोल्हापूर पोलिसांनी केले होते, या ट्विटला अनेकांनी कमेंट करुन सकारात्मक मेसेजचे कौतुक केलं आगहे.