कोरोनामुळे शिवरायांच्या पादुकांचा होणार डोक्यावरून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:06 AM2021-04-28T04:06:50+5:302021-04-28T04:06:50+5:30

पालखी सोहळ्याचे वेळापत्रक घोषित; पंढरीतील विठ्ठलाच्या भेटीसाठी रायगडहून २८ जूनला प्रस्थान लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रायगडहून पंढरीतील विठोबाच्या ...

The corona will make Shivaraya's shoes travel overhead | कोरोनामुळे शिवरायांच्या पादुकांचा होणार डोक्यावरून प्रवास

कोरोनामुळे शिवरायांच्या पादुकांचा होणार डोक्यावरून प्रवास

Next

पालखी सोहळ्याचे वेळापत्रक घोषित; पंढरीतील विठ्ठलाच्या भेटीसाठी रायगडहून २८ जूनला प्रस्थान

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रायगडहून पंढरीतील विठोबाच्या भेटीस दरवर्षी जाणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान २८ जून रोजी सकाळी ९ वाजता रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज समाधी मेघडंबरीपासून होईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे शिवरायांच्या पादुका डोक्यावर घेऊनच केवळ ५ शिवभक्त रायगडवरून पंढरीस जातील. गेल्या वर्षीही कोरोनाच्या प्रकोपामुळे रायगडावरून केवळ तीन शिवभक्त शिवरायांच्या पादुका घेऊन पंढरपूरला गेले होते.

रायगडाहून प्रस्थान केल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पादुकांचा पहिला विसावा पाचाडमधील जिजाऊ मांसाहेबांच्या समाधी छत्रीजवळ असेल. आऊसाहेबांचा आशीर्वाद व निरोप घेऊन शिवभक्त पहिल्या मुक्कामी पळसगाव खुर्दमधील मारुती मंदिरात येतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा मुक्काम श्रीरामपूरमध्ये करून तिसऱ्या दिवशीच्या मुक्कामास ३० जून रोजी ऐतिहासिक ताम्हिणी घाटातील जुन्या पाऊलवाटेने पुणे जिल्ह्याच्या सीमेवर मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावात येतील. तेथून मजलदरमजल करत ४ जुलैला तुकोबारायांच्या पालखी मार्गावर सहभागी होण्यासाठी पुण्यनगरीत दाखल होतील.

ज्ञानेश्वर माउली, तुकाराम महाराज व शिवाजी महाराज यांच्या भेटीचा उत्सव हडपसरला ५ जुलैला पार पडेल. त्यानंतर पालखी सोलापूर महामार्गाने चौफुला, दौंड, माळेगाव, बारामती, इंदापूर, अकलूज, तोंडले-बोंडले, भाळवणी मार्गे आषाढ शुद्ध दशमी, १९ जुलैला पांडुरंगाच्या दर्शन ओढीने पंढरपुरात मुक्कामी पोहोचेल. एकादशीला चंद्रभागास्नान व नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आषाढी वारीतील शिवबा-विठोबा भेटीचा सोहळा श्रीविठ्ठल मंदिरात पार पडेल. गुरुपौर्णिमेस नियोजित राष्ट्रसमर्पण अभिवादन असल्याने शिवरायांच्या पादुकांचा परतीचा प्रवास द्वादशीलाच वाहनाने होऊन केवळ तीनच मुक्कामांत पालखी २३ जुलैला पुन्हा रायगडात दाखल होईल.

................................

Web Title: The corona will make Shivaraya's shoes travel overhead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.