लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील काही दिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५० वर स्थिरावली होती. मात्र, बुधवारी यामध्ये वाढ होत दिवसभरात ५१४ बाधित रुग्ण, तर चारजणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत मुंबईत ७ लाख ३६ हजार २८४ रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी ६०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण ७ लाख १३ हजार १७४ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या चार हजार ६०२ सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. दिवसभरात मृत्युमुखी पडलेल्या चारही रुग्णांना सहव्याधी होत्या. यापैकी दोन रुग्ण पुरुष आणि दोन रुग्ण महिला होत्या. आतापर्यंत १६ हजार ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर आता ०.०६ टक्के एवढा आहे. दिवसभरात २९ हजार ८८६ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ९७ लाख ९९ हजार ८३९ चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १२७७ दिवसांवर आला आहे.