दादरमध्ये एकाच कुटुंबातील पाच लोकांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 02:19 AM2020-04-12T02:19:40+5:302020-04-12T02:20:03+5:30

शिवाजी पार्क परिसर येथे राहणाºया ज्येष्ठ नागरिकाला सर्वप्रथम कोरोना झाला होता.

Coronary Infection Of Five People In One Family In Dadar | दादरमध्ये एकाच कुटुंबातील पाच लोकांना कोरोनाची लागण

दादरमध्ये एकाच कुटुंबातील पाच लोकांना कोरोनाची लागण

Next

मुंबई : दादर पश्चिम येथील चितळे पथ येथे राहणाऱ्या कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबातील आणखी चार सदस्यांना कोरोना झाल्याचे चाचणीतून उघड झाले आहे. एन.सी. केळकर मार्गावर राहणाºया ५१ वर्षीय व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या ११ झाली आहे़

शिवाजी पार्क परिसर येथे राहणाºया ज्येष्ठ नागरिकाला सर्वप्रथम कोरोना झाला होता. त्यांनतर या विभागातील रुग्णांची संख्या वाढतच आहे. चार दिवसांपूर्वी चितळे पथ येथील एका इमारतीमध्ये राहणाºया ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली होती. त्या वेळेस पालिकेने खबरदारी म्हणून त्याच कुटुंबातील जवळच्या संपर्कातील काही लोकांची चाचणी केली होती. यापैकी ३८ आणि ६५ वर्षीय महिला, तसेच ५१ आणि ३० वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. ते राहत असलेल्या इमारतीमध्ये प्रवेश बंद करून तिथे निर्जंतुकीकरण यापूर्वी करण्यात आले आहे. एन.सी. केळकर मार्गावरील इमारतीत राहणारी ५१ वर्षीय व्यक्तीही कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

च्याआधी शिवाजी पार्क येथील ज्येष्ठ नागरिक, पोर्तुगिज चर्चशेजारील इमारतीत राहणाºया महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर चितळे पथ येथील इमारतीत राहणाºया ज्येष्ठ नागरिकाला कोरोना झाल्याचे समोर आले. च्चितळे पथ येथे आतापर्यंत कोरोनाचे सहा रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या परिसरात खबरदारी घेण्यात येत आहे. च्सुश्रुषा रुग्णालयाच्या दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर येथील २८ वैद्यकीय कर्मचाºयांची चाचणी करण्याचे आदेश पालिकेने दिले.

Web Title: Coronary Infection Of Five People In One Family In Dadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.