मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनामधील दोन रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांची तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे हे जवान राहत असलेले मुंबई सेंट्रल येथील आरपीएफची वसाहत सील केली आहे.
एक जवान पश्चिम रेल्वेच्या मिशन फूड डिस्ट्रीब्यूशन मोहिमेत सहभागी होता. तर, दुसरा जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये कार्यरत होता. एका आरपीएफ जवानाला कर्तव्यावर असताना खोकला आणि सर्दी झाली होती. तेव्हा तो नायर रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी औषध देऊन विश्रांती घेण्याचे सल्ला दिला. मात्र वारंवार खोकला सुरूच होता. खोकल्याचे प्रमाण वाढल्याने आरपीएफ जवान जगजीवन राम रुग्णालयात तपासणीसाठी गेला. या रुग्णालयात डॉक्टरांनी पुन्हा औषध देऊन त्याला घरी पाठविले. मात्र जवानाला अधिक त्रास होऊ लागला. पुन्हा जगजीवन राम रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी आरपीएफ जवानाची कोरोना चाचणी घेतली. तेव्हा आरपीएफ जवाना कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.
आरपीएफ जवानाला देखील ताप आणि खोकला होता. तो जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला होता. मात्र त्याला सुद्धा डॉक्टरांनी औषध देऊन विश्रांती करण्याची सल्ला दिला. मात्र खोकला आणि ताप कमी न झाल्यामुळे दुसऱ्यांदा रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली. तेव्हा तो कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आला. या दोन्ही आरपीएफ जवानांचा उपचार पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. तसेच या दोन्ही जवानांच्या कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर हे आरपीएफ जवान जिथे राहतात. तो परिसर सील करण्यात आला आहेत. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व आरपीएफ जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
---------------------------
दोन आरपीएफ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई सेंट्रल आणि चर्चगेट येथे हे दोन कर्मचारी कार्यरत होते. त्याच्यावर उपचार सुरु आहे. यासह मुंबई सेंट्रल येथील आरपीएफ वसाहत सील केली आहे. मिशन फूड डिस्ट्रीब्यूशन मोहिमेत कोरोना पॉझिटिव्ह जवान कार्यरत नव्हता, अशी महिती पश्चिम रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त विनीत खरब यांनी दिली.
--------------------------