कोरोनाचा कवितासंग्रह प्रकाशित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:35 AM2021-02-05T04:35:25+5:302021-02-05T04:35:25+5:30
मुंबई : ‘कोरोनाच्या कविता’ हा शिवाजी गावडे संपादित काव्यसंग्रह कोरोना योध्दे सुनील राणे यांच्या हस्ते प्रकाशित ...
मुंबई : ‘कोरोनाच्या कविता’ हा शिवाजी गावडे संपादित काव्यसंग्रह कोरोना योध्दे सुनील राणे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ नागरिक गोपाळ अनुभवणे व लेखिका-पर्यवेक्षक स्वाती गावडे उपस्थित होत्या. हा कार्यक्रम ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’ आणि ‘कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई उपनग’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा- २०२१’अंतर्गत करण्यात आला. यात समीक्षक कमलाकर राऊत यांनी ‘कोरोनाच्या कविता’ संग्रहावर मनोगत व्यक्त केले. तर भाषा पर्यवेक्षक स्वाती गावडे यांनी कवी-गीतकार कमलाकर राऊत यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेतला.
‘कोरोनाच्या कविता’ हा प्रातिनिधिक संग्रह लेखक, समीक्षक शिवाजी गावडे यांनी संपादित केला आहे. त्यात अखिल महाराष्ट्रातील मान्यवर कवींबरोबर नवोदित कवींच्या कोरोनाच्या जागतिक महामारीच्या एकाच घटनेवरील विविध स्वरूपाच्या एकूण ११४ कविता समाविष्ट आहेत. संग्रहाला प्रा. अशोक बागवे यांचा मलपृष्ठ मजकूर असून, लेखक-समीक्षक कमलाकर राऊत यांची प्रस्तावना लाभली आहे. संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे यांनी अल्पावधित हा संग्रह मुद्रित केला.
कार्यक्रमाच्या शेवटी सुनील राणे यांचा शाल व सुविचार लिखित ‘कलामंच’चे कॅलेंडर देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती गावडे यांनी केले. साधना राणे, सोनाली जपे, निधी अनुभवणे आणि विजय गावडे यांनी सहकार्य केले.
-------------------------------------------