Join us

कोरोनाचे संकट पुन्हा डोके वर काढते आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:07 AM

शुक्रवारी राज्यात तीन हजार ६७० रुग्णांची नोंद, तर ३६ जणांचा मृत्यूसुधारित बातमीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पूर्वपदावर ...

शुक्रवारी राज्यात तीन हजार ६७० रुग्णांची नोंद, तर ३६ जणांचा मृत्यू

सुधारित बातमी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पूर्वपदावर येत असलेल्या दैनंदिन व्यवहारापाठोपाठ मुंबई महानगरासह राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्णही हळूहळू वाढत आहेत. शुक्रवारी राज्यात तीन हजार ६७० रुग्णांची नोंद झाली, तर ३६ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक १०१६ रुग्ण मुंबई महानगर प्रदेशात नोंदले गेले आहेत. त्या खालोखाल अकोला मंडळात ६८३, पुणे मंडळात ६५७, नागपूर मंडळात ६३० आणि नाशिक मंडळात ४०६ रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाचे संकट पुन्हा डोके वर काढत असल्याची भीती व्यक्त होत आहे.

१ फेब्रुवारीला राज्यात एकूण १९४८ नवीन रुग्ण नोंदले होते. ५ फेब्रुवारीला २६२८ नवीन रुग्ण, तर १० फेब्रुवारी रोजी ३४५१ नवीन रुग्णांची नोंद झाली होती.

शुक्रवारी दोन हजार ४२२ रुग्ण बरे झाले. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ७२ हजार ४७५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९१ टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एक कोटी ५२ लाख १९ हजार ४१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ५६ हजार ५७५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात शुक्रवारपर्यंत एक लाख ६८ हजार ८७ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइन आहेत तर एक हजार ७८९ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरण्टाइन आहेत. सध्या राज्यात एकूण ३१ हजार ४७४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २० लाख ५६ हजार ५७५ झाली आहे. राज्यातील मृत्युदर २.५ टक्के एवढा आहे.

-------------

महिना फेब्रुवारी

दिनांक आणि रुग्णांची नोंद

१२ - ३६७०

११ - ३२९७

१० - ३४५१

०९ - २५१५

०८ - २२१६

०७ - अहवाल नाही

०६ - २७६८

०५ - २६२८

०४ - २७३६

०३ - २९९२

०२ - १९२७

०१ - १९४८

...........................

* लाॅकडाऊन लागू करण्याबाबत विचार नाही - राजेश टाेपे

राज्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असली तरी तुर्तास लाॅकडाऊन लागू करण्याबाबत काेणताही विचार नाही, असे राज्याचे आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.--------------------