राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:06 AM2020-12-25T04:06:38+5:302020-12-25T04:06:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात गुरुवारी दिवसभरात काेराेनाच्या ३ हजार ५८० रुग्णांचे निदान झाले असून ८९ मृत्यूंची नोंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गुरुवारी दिवसभरात काेराेनाच्या ३ हजार ५८० रुग्णांचे निदान झाले असून ८९ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख ९ हजार ९५१ झाली असून बळींची संख्या ४९ हजार ५८ झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५ टक्के असून मृत्युदर २.५७ टक्के आहे. सध्या राज्यात ५४,८९१ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात गुरुवारी दिवसभरात ३,१७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १८ लाख ४ हजार ८७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २३ लाख ४१ हजार २०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.४८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ८२ हजार ७७९ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३ हजार ८१० व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
...........................