मुंबईत कोरोनाचा कहर कायम ! २४ तासांत १० हजारांहून अधिक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:07 AM2021-04-07T04:07:17+5:302021-04-07T04:07:17+5:30
मुंबई : मुंबईत कोरोनाचा कहर कायम असून दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहर, उपनगरांत मागील २४ तासांत १० हजार ...
मुंबई : मुंबईत कोरोनाचा कहर कायम असून दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहर, उपनगरांत मागील २४ तासांत १० हजार ३० रुग्ण आणि ३१ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ७२ हजार ३३२ झाली असून बळींचा आकडा ११ हजार ८२८ झाला आहे. सध्या मुंबईत ७,४९५ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत रुग्ण दुपटीच्या कालावधीत चिंताजनक घट झाली असून हा कालावधी केवळ ३८ दिवसांवर आला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर ८१ टक्के आहे. मुंबईत दिवसभरात ७,०१९ जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ लाख ८२ हजार ४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. ३० मार्च ते ५ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.७९ टक्के आहे. शहर उपनगरातील झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेनमेंट झोन्स ७३ आहेत, तर ७४० सक्रिय सीलबंद इमारती आहेत.
रुग्णसंख्येचा चढता आलेख
गेल्या वर्षभरात १ फेब्रुवारीला ३२८ म्हणजेच सर्वांत कमी रुग्ण आढळले आहेत. त्यात वाढ होत जाऊन १८ मार्चला २८७७, १९ मार्च ३०६२, २० मार्च २९८२, २१ मार्च ३७७५, २२ मार्च ३२६०, २३ मार्च ३५१२, २४ मार्च ५१८५, २५ मार्च ५५०४, २६ मार्च ५५१३, २७ मार्च ६१२३, २८ मार्च ६९२३, २९ मार्च ५८८८, ३० मार्च ४७५८, ३१ मार्च ५३९४, १ एप्रिल ८६४६, २ एप्रिल ८८३२, ३ एप्रिल ९०९०, ४ एप्रिल १११६३, ५ एप्रिल ९८५७, ६ एप्रिल १००३० नवे रुग्ण आढळून आले आहेत.