Join us

कोरोनामुळे डिजिटल लोकशाहीकडे मार्गक्रमण  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 6:34 PM

Digital Democracy : सीआयआय आणि फ्यूच्यर फँक्टरीचा अहवाल

मुंबई : कोरोना संकटामुळे केवळ डिजीटल अर्थव्यवस्थाच बळकट होत नसून मानवी कार्यपध्दती बदल होत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. दूरस्थ कामामुळे लोकांची सहिष्णूता वाढली आहे. सामाजिक वीणही त्यामुळे बदलत आहे. व्यवसाय वृध्दीसाठी नवी कार्यशैली स्वीकारली जात आहे. आरोग्य सेवांचेही डिजिटलायझेशन झाले असून विविध क्षेत्रातील आँटोमेशनने वेग धरला आहे. त्यातून आपले ‘डिजिटल लोकशाही’कडे मार्गक्रमण होत आहे.

काँन्फिडरेशन आँफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि फ्यूचर फँक्टरी या संस्थांनी ‘शेप आँफ दी फ्यूचर’ हा आपला सर्वेक्षण अहवाल नुकताच प्रसिध्द केला असून त्यात हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. केवळ अर्थव्यवस्थेतील बदल या अहवालाने टिपले नसून भविष्यातील व्यवसायांची वाटचाल कशी असेल याबाबतही मार्गदर्शन केले आहे. ग्राहकांची वर्तणूक कशा पध्दतीने बदलत आहे याचा मागोवा त्यात घेण्यात आला आहे. कोरोना पूर्वीचा आणि पश्चातचा काळ यात मोठा फरक असेल असा निष्कर्ष त्यातून काढण्यात आला आहे. डिजीटल व्यवहारांना आता ग्राहकांच्या आर्थिक श्रेणीचे बंधन राहिले नसून ते सर्वदूर केले जात आहेत. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन गरजांवर आणि समाजावरही होणार असल्याचे मत फ्यूचर फँक्टरीच्या बिहेवियरल रिसर्च केंद्राच्या प्रमुख गीतीका कांबळी यांनी व्यक्त केले आहे. तर, उद्योग क्षेत्रात अनिश्चिततेचे वातावरण आणि नवी आव्हाने असतानाही त्यांचा स्वीकार उद्योग क्षेत्राकडून होत असल्याचे मत सीआयआयच्या पश्चिम क्षेत्र इनोव्हेशन समितीचे अध्यक्ष राजेंद्र नवानी यांनी सांगितले.  

कोरोना संक्रमणामुळे आरोग्य क्षेत्रात कमालीचे बदल झाले असून डिजीटल माध्यमांच्या मदतीने रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावरील उपचार हे त्यांच्या सबलिरणाची साक्ष देत असल्याचे या अहवलात नमूद करम्यात आले आहे. आँटोमेशनमुळे छोट्या व्यावसायिकांच्या कार्यपध्दतीत मोठा बदल झाला असून एकप्रकारे त्यांचे डिजीटल ट्रान्सफाँर्मेशन झाले आहे. आपण कशा पध्दतीने खरेदी करतो, प्रवास कसा करतो, काय खातो , कसे खातो यातले बदल हे व्यवसायांची इकोसिस्टीम बदलणारी असल्याचेही हा अहवाल सांगतो.

 

टॅग्स :डिजिटलकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्यालॉकडाऊन अनलॉक