कोरोनाचे रूग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने ओलांडला दोनशे दिवसांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 03:48 PM2020-11-06T15:48:51+5:302020-11-06T15:49:13+5:30

Corona News : चेज द व्हायरस, मिशन झिरो, ट्रेसिंग-ट्रॅकींग-टेस्टींग-ट्रिटिंग

Corona's patient doubled over a period of two hundred days | कोरोनाचे रूग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने ओलांडला दोनशे दिवसांचा टप्पा

कोरोनाचे रूग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने ओलांडला दोनशे दिवसांचा टप्पा

Next

 

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनावर ब-यापैकी नियंत्रण मिळत आहे. महापालिकेने यासाठी केलेली कामे उपयोगी ठरत आहेत. आणि याचे फळ म्हणून आता मुंबईत केवळ ८ दिवसांत रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल ५१ दिवसांनी वाढून १५७  दिवसांवरून २०८ दिवसांवर पोहोचला आहे.

चेज द व्हायरस, मिशन झिरो, ट्रेसिंग-ट्रॅकींग-टेस्टींग-ट्रिटिंग या चतु:सूत्रीनुसार करण्यात येत असलेली कार्यवाही; माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत सुरु असलेल्या भेटी, नागरिकांची पडताळणी, पोलीसांच्या मदतीने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंध विषयक बाबी आणि मुंबई महापालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. 

२० ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा मुंबईने रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधीचा १०० दिवसांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी १५७ दिवसांचा टप्पा ओलांडला. महापालिकेच्या २४ विभागांपैकी ४ विभागांनी ३०० दिवसांचा, ११ विभागांनी २०० दिवसांचा, ६ विभागांनी १७५ दिवसांचा तर उर्वरित  ३ विभागांनीही १५० दिवसांचा टप्पा ओलांडलेला आहे.

----------------------

300 दिवसांपेक्षा जास्त ४ विभाग (जी उत्तर ३५१ दिवस, एफ दक्षिण ३१६ दिवस, ए ३०८ दिवस, सी ३०६ दिवस)

२०० दिवसांपेक्षा जास्त ११ विभाग ( जी दक्षिण २८३ दिवस, एल २४५ दिवस, ई २४२ दिवस, एस २३८ दिवस, डी २३३ दिवस, एफ उत्तर २१३ दिवस, एम पूर्व आणि के पूर्व २०७ दिवस, एच पश्चिम २०६ दिवस, एच पूर्व २०३ दिवस आणि के पश्चिम २०० दिवस)

१७५ ते १९९       ६ विभाग (  पी दक्षिण, बी, पी उत्तर, टी, आर दक्षिण, एन)

१५० ते  १७४     ३ विभाग (  आर उत्तर, एम पश्चिम, आर मध्य)

----------------------

टप्पे
१०० दिवस - २० ऑक्टोबर
१२६ दिवस - २४ ऑक्टोबर
१५० दिवस - २९ ऑक्टोबर
२०८ दिवस - ५ नोव्हेंबर 

----------------------

मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याचा सर्वात जास्त  कालावधी असलेले ५ विभाग..
 
जी उत्तर     ३५१ दिवस 
एफ दक्षिण  ३१६ दिवस 
ए                ३०८  दिवस 
सी               ३०६ दिवस 
जी दक्षिण     २८३ दिवस 

----------------------

मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याचा  सर्वात कमी कालावधी असलेले ५ विभाग....
आर दक्षिण    १८१ दिवस 
एन                १७५  दिवस  
आर उत्तर      १७२ दिवस
एम पश्चिम      १६३ दिवस 
आर मध्य       १५० दिवस

Web Title: Corona's patient doubled over a period of two hundred days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.