मुंबई : शहराचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने गजबजलेल्या दादर विभागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पेट्रोल पंप, बेकरी, ज्वेलरी आदी दुकानांमधील कर्मचाऱ्यांची नियमित चाचणी करण्यात येत होती. त्याचा प्रभाव आता दिसून येत असून, दादरमध्ये गुरुवारी एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.
जी उत्तर विभागातील दादर, माहीम, धारावी भागांमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आले आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या दादर परिसरात लोकांची वर्दळ अधिक प्रमाणात असते. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान दादरमध्ये बाधित रुग्णांचा आकडा वाढला होता. सावधगिरीची उपाययोजना म्हणून पालिकेने या विभागांमध्ये कोरोना चाचणी सुरू ठेवली. यासाठी विशेष चाचणी शिबिरेही आयोजित करण्यात आली.
आजची आकडेवारी....
परिसर... एकूण रुग्ण... सक्रिय... डिस्चार्ज... आज
धारावी...६९९९...११....६५९६...०३
दादर....९९६१..३५....९६४५....००
माहीम....१०२७१...९१...९९७३