राज्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण ९४.२९ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:06 AM2020-12-29T04:06:54+5:302020-12-29T04:06:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२९ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर मृत्युदर २.५७ टक्के ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२९ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर मृत्युदर २.५७ टक्के इतका आहे. राज्यात रविवारी २,१२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत १८ लाख ९ हजार ९४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात दिवसभरात ३,३१४ रुग्ण आणि ६६ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख १९ हजार ५५० झाली असून, एकूण कोरोना बळी ४९,२५५ झाले आहेत. सध्या राज्यात ५९,२१४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २५ लाख २ हजार ५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.३५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ५७ हजार ३८५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३,३२३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. राज्यात मुंबईत ८,३५५, ठाण्यात १०,६८८ आणि पुण्यात १४,८४८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ६६ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. तर ३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवड्यांपेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ६६ मृत्यूंमध्ये मुंबई ८, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा २, रायगड १, पनवेल मनपा १, नाशिक ६, नाशिक मनपा २, अहमदनगर २, अहमदनगर मनपा १, जळगाव १, सोलापूर मनपा १, सातारा २, कोल्हापूर मनपा १, सिंधुदुर्ग ३, औऱंगाबाद १, औरंगाबाद मनपा १, जालना १, लातूर १, नांदेड १, नांदेड मनपा १, वाशिम १, नागपूर ८, नागपूर मनपा ८, वर्धा ८, गोंदिया १, चंद्रपूर १ या रुग्णांचा समावेश आहे.