दोनच दिवसांपूर्वी एकाच दिवसात १ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचा विक्रम भारताने केला. आतापर्यंत देशात ६२ कोटी लोकांना लस देऊन झाली असून त्यातील साडेचौदा कोटी लोकांनी लसींचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. लसीच्या दुसऱ्या डोसबाबत बराच संभ्रम आहे. हा डोस घ्यायलाच हवा का इथपासून वेळेत नाही मिळाला दुसरा डोस तर काय, इथपर्यंत अनेक प्रश्न-उपप्रश्न उपस्थित केले जात आहेत.
लसीचे दोन डोस गरजेचे का?
- लसीच्या पहिल्या डोसनंतर शरीरात विषाणूरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होते.
- पहिल्या डोसमुळे निर्माण झालेली ही प्रतिकारशक्ती कालांतराने क्षीण होत जाते.
- लसीचा दुसरा डोस क्षीण होत चाललेल्या या प्रतिकारशक्तीला पुन्हा तेजी देतो आणि शरीरात पुन्हा जोमाने विषाणूरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होते.
- कोरोनाच्या डेल्टासारख्या व्हेरिएंटपासून संरक्षण हवे असेल तर लसीचे दोन्ही डोस गरजेचे आहेत.
विहित कालवधीत लसीचा दुसरा डोस नाही घेतला तर काय?
- दुसरा डोस घेण्यास विलंब झाला तरी त्यामुळे काही नुकसान होत नाही.
- पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेण्यासाठी दिलेली मुदत संपली तरी त्यानंतर दोन आठवड्यांची मुदत उपलब्ध असते.
- काही अभ्यासांतून दोन डोसमधील अंतर सहा ते आठ महिने राहिले तरी पहिल्या डोसचा प्रभाव कायम असतो.
- ठारावीक मुदतीत दुसरा डोस घेतला गेला नाही तर पहिल्या डोसनंतर निर्माण झालेली प्रतिकारशक्ती फारशी प्रभावी ठरत नसल्याने पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते.
- कोरोनाचा संसर्ग झाल्यास दुसऱ्या डोसचा कालावधी पुन्हा वाढतो आणि प्रतिकारशक्ती घटते.
- दोन डोसमधील अंतर खूपच वाढल्यास त्याचा प्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम होतो.
लसी आणि दोन डोसमधील अंतर
कोविशिल्ड : १२ ते १६ आठवडेकोव्हॅक्सिन : ४ ते ६ आठवडेस्पुतनिक व्ही : ३ ते ४ आठवडेमॉडर्ना : ४ ते ६ आठवडेझायकोव्ह डी: ४ ते ६ आठवडे