यदु जोशीमुंबई : राज्यात १८ वर्षे वयावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या लसींची खरेदी जागतिक निविदा काढून न करता देशी कंपन्यांकडूनच ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. विदेशी कंपन्यांकडून लस खरेदी केल्यास किमान दोन महिने ती मिळणार नाही. साठवणुकीसाठी आवश्यक असलेले तापमान टिकवणाऱ्या यंत्रणेचा आपल्याकडे अभाव असल्याने जागतिक निविदेला तूर्त फाटा मिळेल, असे चित्र आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाबाहेरील कंपन्यांकडून लस खरेदी करण्यात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. देशांतर्गत कंपन्यांकडूनच लस खरेदी करण्याचे स्पष्ट सुतोवाच करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने उत्पादित केलेली लस वापरण्याची परवानगी केंद्र सरकारने दिलेली आहे.
तथापि ती उपलब्ध होण्यासाठी तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. तसेच रशियाकडून उत्पादित स्पुटनिक लसीसाठीदेखील दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या लसींसाठी परदेशी लस उत्पादन कंपन्यांनी लिगल इंडेन्मिटी (कायदेशीर संरक्षण) मागितली आहे. आयात प्रक्रिया केल्याने वितरणामध्ये उणे ७० डिग्री सेल्सिअस इतके तापमान तसेच (पान १० वर)