अतुल कुलकर्णीमुंबई : कोरोना वर उपाय म्हणून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र देशात अव्वल ठरला असला, तरी लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांचे प्रमाण फक्त २३ लाख आहे. त्याच वेळी लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण १ कोटी ३० लाखाच्या वर गेले आहे. त्यामुळे येत्या काळात दुसरा डोस घेणार्यांना देखील तेवढेच प्राधान्य द्यावे लागणार आहे.
महाराष्ट्रात हेल्थ केअर वर्कर गटात लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या ३० जिल्ह्यांनी अद्याप २५ हजाराचा टप्पा ओलांडलेला नाही. फ्रंट लाईन वर्कर्स मध्ये देखील लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या ३२ जिल्ह्यांनी २५ हजाराचा टप्पा ओलांडलेला नाही. तर ४५ वर्षे वयाच्या गटात २४ जिल्ह्यांनी हा टप्पा ओलांडलेला नाही.
महाराष्ट्रात एकूण दीड कोटी लोकांनी लस घेतली आहे. त्यापैकी १२ जिल्हे दोन लाखाच्या आतले आहेत. तर दोन ते तीन लाखाच्या मध्ये १० जिल्हे असून तीन ते पाच लाखाच्या मध्ये ३ जिल्ह्यांचा व पाच लाखाच्या पुढे ७ जिल्ह्यांचा समावेश आहे. दोन तास लसीकरणाच्या लाईनमध्ये थांबावे लागले तर लोक अस्वस्थ होतात. मात्र १६ जानेवारीपासून राज्यातील आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र लसीकरणाच्या मोहिमेत व्यस्त आहेत. शनिवार-रविवार देखील लसीकरणाला सुट्टी नाही. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळात राज्यभर लसीकरण सुरू आहे.
एकूण लसीकरण केंद्रे ४५००
टॉप १०
मुंबई२४,१५,०७६पुणे२१,८३,४९०ठाणे ११,९१,०८३कोल्हापूर९,३२,९२०नागपूर ९,२९,९०३नाशिक ६,८९,५५४सातारा ५,८६,५६१सांगली ५,४६,९८०अहमदनगर ४,४३,३६३औरंगाबाद४,२५,४७७
बॉटम १०
हिंगोली ६४,५७६गडचिरोली८१,७५४सिंधुदुर्ग १,०९,९५५नंदुरबार१,१८,४९७वाशीम१,५२,१३५उस्मानाबाद १,५२,५६१रत्नागिरी १,५५,८९६गोंदिया १,५८,५५५परभणी १,५८,८२६अकोला१,८९,८९२
डॉक्टरांनी केली विनंतीआम्ही कोणत्या परिस्थितीत काम करत आहोत, याचा थोडा विचार करा, आणि आम्हाला सहकार्य करा, अशी विनंती लसीकरण मोहिमेतील अनेक डॉक्टरांनी केली आहे.