coronavirus: राज्यात १ लाख ३१ हजार सक्रिय रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 06:24 AM2020-10-28T06:24:09+5:302020-10-28T06:26:04+5:30

coronavirus Maharashtra : राज्यात दिवसभरात काेराेनाचे ७ हजार ८३६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १४ लाख ७८ हजार ४९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

coronavirus: 1 lakh 31 thousand active patients in the Maharashtra | coronavirus: राज्यात १ लाख ३१ हजार सक्रिय रुग्ण

coronavirus: राज्यात १ लाख ३१ हजार सक्रिय रुग्ण

Next

 मुंबई : राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मागील मंगळवारी राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार २६५ इतकी होती, तर मंगळवारी दिवसभरात (२७ ऑक्टाेबर) रोजी ही संख्या १ लाख ३१ हजार ५४४ इतकी झाली. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३९ टक्के झाले असून मृत्युदर २.६३ टक्के आहे.

राज्यात दिवसभरात काेराेनाचे ७ हजार ८३६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १४ लाख ७८ हजार ४९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात मंगळवारी ५ हजार ३६३ रुग्णांचे निदान झाले असून ११५ मृत्यू झाले. परिणामी, बाधितांची एकूण संख्या १६ लाख ५४ हजार २८ झाली असून मृतांचा आकडा ४३,४६३ झाला.  

सक्रिय रुग्णांची संख्या 
लक्षणे / लक्षणेविरहित / मध्यम / सौम्य लक्षणे असलेले रुग्ण ८९ टक्के, गंभीर रुग्ण ६ टक्के, ऑक्सिजनवर असलेले रुग्ण ५ टक्के
 ३१ ते ४० वयोगटात सर्वाधिक कोरोना रुग्ण असून ही संख्या ३ लाख ३८ हजार ४८९.
 ९१ ते १०० वयोगटातील ३ हजार १८ रुग्ण.
 नवजात बालक ते १० वर्षांपर्यंत ५९ हजार ५५२ रुग्ण, तर ११ ते २० वयोगटात १ लाख ११ हजार ६९१ रुग्ण. 

मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी १३९ दिवसांवर
 मुंबईत दिवसभरात काेराेनाचे १ हजार ४३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख २२ हजार ५०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे शहर, उपनगरात बरे झालेल्या रुग्णांचा दर ८८ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा कालावधी १३९ दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईत सध्या १८,६३३ सक्रिय रुग्ण आहेत. शहर, उपनगरात दिवसभरात काेराेनाच्या ८०१ रुग्णांचे निदान झाले असून २३ बळींची नाेंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या २ लाख ५२ हजार ८८६ झाली असून मृतांचा आकडा १० हजार १६५ झाला आहे.  

राज्यात २४ हजारांहून अधिक पाेलिसांची काेराेनावर मात
 राज्य पोलीस दलातील २४ हजार ३८३ अधिकारी, अंमलदारांनी काेराेनावर मात केली असून २८२ जणांना जीव गमवावा लागला.
काेराेना काळात राज्यभरातील २६ हजार २५४ पोलीस व अधिकाऱ्यांना संसर्ग झाला. यातील २७ अधिकारी व २५५ अंमलदारांचा मृत्यू झाला. तर २४ हजार ३८३ जणांनी काेराेनावर मात केली. 
  सध्या १,८७१ अधिकारी व अंमलदार कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांपैकी ८५ टक्के पोलीस पुन्हा कर्तव्याच्या ठिकाणी रुजू झालेे.

Web Title: coronavirus: 1 lakh 31 thousand active patients in the Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.