मुंबई - कोरोना पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेचा ताण वाढत आहे. या काळातही आपले पोलीस अत्यंत उत्तम रितीने कार्य करत आहेत. या संसर्गाचा मुकाबला करताना त्यांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, शासन त्यांच्या सदैव पाठीशी आहे असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी सांगितले.
मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलिसांसाठी सुरक्षा साधन संचाचे (किट) व स्पेशल प्लास्टीक मास्क वाटप प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग , सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विनय चोबे, सहपोलीस आयुक्त (प्रशासन) नवल बजाज, आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. एकुण १० हजार सुरक्षा किट वितरण करण्यात येणार आहे.
राज्यातील पोलीस यंत्रणा या काळात आरोग्याचा धोका पत्कारुन १६-१६ तास कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पोलिसांच्या सुरक्षेबाबत आधुनिक अशा या आरोग्याबाबतच्या सुरक्षा साधन संचाचे वाटप करण्यात येत आहे. ही बाब महत्वपुर्ण व अभिनंदनीय आहे. आपण वापरत असलेल्या नेहमीच्या मास्क व्यतिरिक्त या संचातील साधनांचा उपयोग केल्यास त्याचा फायदा पोलिसांना आरोग्य सुरक्षा दृष्टिने नक्कीच होईल असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ...म्हणून 'पबजी' 24 तास राहणार बंद
Coronavirus : धक्कादायक! ICU ला असलेल्या कुलूपाने संपवला तिचा जीवनप्रवास