Join us

coronavirus: कोविडसंदर्भात आतापर्यंत १.०१ लाख गुन्हे दाखल - अनिल देशमुख  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 7:07 AM

राज्यात २२ मार्च ते ९ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १,०१,३१६ गुन्हे नोंद झाले असून १९,५१३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८२लाख २७ हजार ७९४ रुपयांचा दंड आकारला आहे.

मुंबई : राज्यात लॉकडाउन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १,०१,३१६ लाख गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २०० घटना घडल्या. त्यात ७३२ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.राज्यात २२ मार्च ते ९ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १,०१,३१६ गुन्हे नोंद झाले असून १९,५१३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८२लाख २७ हजार ७९४ रुपयांचा दंड आकारला आहे. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाइन असा शिक्का आहे अशा ६६० व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,५५,२६६ व्यक्ती क्वारंटाइन आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलिसांमार्फत ३,९८,३३८ पास देण्यात आले आहेत. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२९१ वाहनांवर गुन्हे दाखल करत ५५,६५० वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांवर व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे नोंदवले, असे त्यांनी सांगितले.लॉकडाउनच्या काळात ३६६ सायबर गुन्हे दाखललॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाने ३६६ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी १९८ जणांना अटक करण्यात आली आहे.टिकटॉक, फेसबुक, टिष्ट्वटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाºया गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या ३६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी १६ गुन्हे अदखलपात्र आहेत. त्यामध्ये बीड ३५, पुणे ग्रामीण २९, जळगाव २६, मुंबई २१, कोल्हापूर १६, नाशिक ग्रामीण १५, सांगली १४, ठाणे शहर १३, बुलडाणा १२, जालना १२, नाशिक शहर ११, सातारा १०, पालघर १०, लातूर १०, नांदेड १०, परभणी ८, नवी मुंबई ८, सिंधुदुर्ग ७, अमरावती ७, ठाणे ग्रामीण ७, नागपूर शहर ७, हिंगोली ६, गोंदिया ५, सोलापूर ग्रामीण ५, पुणे शहर ४, रत्नागिरी ४ ,सोलापूर शहर ४, नागपूर ग्रामीण ४, भंडारा ४, पिंपरी- चिंचवड ४, अमरावती ग्रामीण ४, चंद्रपूर ४, रायगड २, धुळे २, वाशिम २, यवतमाळ १, औरंगाबाद १ (एन.सी), यवतमाळ १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप मेसेज फॉरवर्ड केल्याप्रकरणी १५५ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्या प्रकरणी १४३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडीओ शेअर प्रकरणी १६ व आक्षेपार्ह टिष्ट्वट केल्या प्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले आहेत. इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ तर अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्या प्रकरणी ४२ गुन्हे दाखल झाले आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसअनिल देशमुख