Coronavirus: मुंबईत ११ हजार ३९४ कोरोना रुग्ण; दिवसभरात ६९२ कोरोना रुग्णांचे निदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 04:31 AM2020-05-08T04:31:30+5:302020-05-08T04:31:41+5:30

मंत्रालयातील एका ज्येष्ठ आयएएस अधिकारी महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Coronavirus: 11 thousand 394 corona patients in Mumbai; Diagnosis of 692 corona patients in a day | Coronavirus: मुंबईत ११ हजार ३९४ कोरोना रुग्ण; दिवसभरात ६९२ कोरोना रुग्णांचे निदान

Coronavirus: मुंबईत ११ हजार ३९४ कोरोना रुग्ण; दिवसभरात ६९२ कोरोना रुग्णांचे निदान

googlenewsNext

मुंबई : राज्यात मुंबई या मेट्रो शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसागणिक मुंबईतील स्थिती बिघडत असून पालिका व राज्य शासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. शहर उपनगरात दिवसभरात ६९२ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून ११ हजर ३९४ रुग्णसंख्या झाली आहे, तर २४ मृत्यू झाले असून कोरोनाचे ४३७ बळी गेले आहेत.

मुंबईत ३ ते ५ मे पर्यंतच्या प्रयोगशाळांचे झालेल्या १७० कोरोना (कोविड-१९) चाचण्यांचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले आहेत. पालिकेच्या विविध रुग्णालयांत दिवसभरात ५३८ संशयित कोरोना रुग्ण दाखल झाले असून आतापर्यंत १३ हजार २३७ रुग्ण भरती झाले आहेत. तर गुरुवारी १४८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत २ हजार ४३५ जण कोरोनामुक्त झाले.

गर्भवतींची रुग्णालयांत विशेष सेवा
गर्भवती महिलांनी नजीकच्या प्रसूतीगृह वा रुग्णालयांत नोंद करणे गरजेचे आहे. ज्या गर्भवती कुटुंबातील कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्या असतील किंवा ज्या गर्भवती महिला कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातून येत असतील त्यांची कोरोना चाचणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केली जाईल. प्रसूती काळ जवळ असलेल्या कोरोना बाधित झालेल्या गर्भवतींना कोरोना केअर सेंटर स्वरुपाच्या केंद्रांमध्ये अथवा नायगाव प्रसूतीगृह येथे दाखल करण्यात येईल. प्रसूतीसोबत अन्य वैद्यकीय समस्या असलेल्या गर्भवतींना नायर रुग्णालय येथे खाटा आरक्षित आहेत. वाडीया रुग्णालय, अंधेरी येथील सूर्या रुग्णालय आणि रावळी कॅम्प प्रसूतिगृह या ठिकाणी अतिरिक्त सुविधा उपलब्ध आहेत. प्रसूतिकाळ जवळ असलेल्या कोरोना बाधित गर्भवतींना या केंद्रांमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

महिला आयएएस अधिकाऱ्यास कोरोनाची लागण
मंत्रालयातील एका ज्येष्ठ आयएएस अधिकारी महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासंदर्भात नियुक्त आपत्ती नियंत्रण कक्षात कार्यरत अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. स्थलांतरित मजुरांसाठी निवारा केंद्रे उभारण्याकरता स्थापन केलेल्या टास्क फोर्समध्येदेखील या महिला अधिकारी होत्या. त्या एका विभागाच्या सचिव आहेत. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यासोबत काम करणारे ५-६ अधिकारी-कर्मचारी यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मंत्रालयात २७ एप्रिल रोजी चार सफाई कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर दोन दिवस निजंर्तुकीकरण करण्यासाठी मंत्रालय बंद ठेवण्यात आले होते.

Web Title: Coronavirus: 11 thousand 394 corona patients in Mumbai; Diagnosis of 692 corona patients in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.