Coronavirus : क्वॉरंटाइनमधून पळालेल्या १५ जणांची धरपकड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 02:12 AM2020-03-24T02:12:07+5:302020-03-24T05:57:41+5:30
coronavirus : कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यास सार्वजनिक वाहतुक व्यवस्था पुर्णपणे बंद केल्याने उपनगर, नवी मुंबई, ठाण्यात राहणाऱ्या मुंबई पोलिसांची सोमवारी मोठी धावपळ उडाली.
मुंबई: करोनावर उपचार घेत असलेले १५ संशयित रुग्ण क्वॉरंटाइनमधून पळाले होते. मात्र, या १५ जणांना ताब्यात घेण्यात प्रशासनाला यश आले आहे. सर्वजण दुबईहून मुंबईत आले होते. हे सर्वजण मूळचे पंजाबचे आहेत. त्यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा स्टँम्प होता. मात्र हे १५जण क्वॉरंटाइन कँम्पमधून पळाले. अंधेरीत त्यांनी लोकल पकडली आणि खारमध्ये उतरले. त्यांना खारमध्येच ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकल, बससेवा बंद झाल्याने पोलिसांची धावपळ
कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यास सार्वजनिक वाहतुक व्यवस्था पुर्णपणे बंद केल्याने उपनगर, नवी मुंबई, ठाण्यात राहणाऱ्या मुंबई पोलिसांची सोमवारी मोठी धावपळ उडाली. पोलिसांना मिळेल त्या वाहनांना वापर करीत कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी त्यांना नेहमीपेक्षा २,३ तास अधिक लागले. ड्युटी संपल्यावर घरी पोहचण्यासाठी विशेष बसची सोय केल्याने सकाळपेक्षा तुलनेत प्रवास सोयीचा ठरला.