Coronavirus: मुंबईत १५ कोरोना रुग्णांचे निदान; १४ वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 12:41 AM2020-03-30T00:41:11+5:302020-03-30T06:25:56+5:30
मुंबईत एकूण १५ कोरोना रुग्णांचे निदान झाले, यात नऊ महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे ट्रेसींग नंतर त्यांची टेस्टींग आणि ट्रीटमेंट म्हणजेच शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसुत्रीप्रमाणे काम करण्यात येत आहे. मुंबईत रविवारी याच त्रिसुत्रीद्वारे महापालिकेच्या आरोग्य पथकांनी बहुतेक रुग्णांचे निदान केले आहे.
मुंबईत एकूण १५ कोरोना रुग्णांचे निदान झाले, यात नऊ महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. तसेच, यात १४ वर्षांच्या आणखीन एका मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईत रविवारी पालिकेच्या केईएम रुग्णालयात ४० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह होती. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात विलगीकरण खाटांची सुविधा आता पूर्णपणे कार्यरत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंर्गत ही सेवा विनामूल्य उपलब्ध आहे.
मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचे विश्लेषण
वय लिंग पत्ता प्रवास/निकट संपर्क भरती रुग्णालय
६६ महिला मुंबई शहर - खासगी
४७ महिला मुंबई शहर यु.एस.ए खासगी
३३ पुरुष उपनगर निकट संपर्क कस्तुरबा
२४ महिला उपनगर निकट संपर्क कस्तुरबा
३१ पुरुष उपनगर यु.के. कस्तुरबा
५७ महिला उपनगर - एच.बी.टी
२२ महिला उपनगर निकट संपर्क एच.बी.टी
२३ पुरुष उपनगर कॅरेबियन,युएसए,लंडन राजावाडी
२३ पुरुष उपनगर - राजावाडी
६३ पुरुष शहर - एमबीपीटी
२१ महिला शहर निकट संपर्क कस्तुरबा
३४ महिला उपनगर - राजावाडी
६० महिला उपनगर निकट संपर्क खासगी
१४ मुलगा उपनगर निकट संपर्क खासगी
४० महिला उपनगर - खासगी