coronavirus: म्हणे लिंक उघडताच खात्यात १५ हजार जमा, पॅकेज जाहीर होताच ऑनलाइन भामटे सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 07:11 AM2020-05-16T07:11:44+5:302020-05-16T07:12:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाभिमानी भारताची घोषणा करताच, तीन दिवसांत विविध आर्थिक पॅकेज जाहीर झाले. याच काळात प्रत्येकाच्या खात्यात विविध रक्कम जमा होण्याच्या अफवाही व्हायरल झाल्या.
मुंबई : स्वाभिमानी भारताची घोषणा होताच विविध पॅकेज जाहिर झाले. यातच विविध आॅफर घेत आॅनलाइन भामटेही सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या नागरिकांच्या खात्यावर एक लिंक पाठवून त्यात क्लिक करताच खात्यात १५ हजार रुपये जमा होतील असे सांगण्यात येत आहे. मात्र अशा अनोळखी लिंकवर क्लिक करू नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाभिमानी भारताची घोषणा करताच, तीन दिवसांत विविध आर्थिक पॅकेज जाहीर झाले. याच काळात प्रत्येकाच्या खात्यात विविध रक्कम जमा होण्याच्या अफवाही व्हायरल झाल्या. त्यात अनेकांच्या मोबाईलवर ‘सध्याच्या कठीण परिस्थितीत मोदीजी सर्वांच्या खात्यात १५ हजार रुपये जमा करत असल्याचे सांगून, खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करताच खात्यात पैसे जमा होतील, ‘पीएम मास्क’ योजेनेअंतर्गत पैसे देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आह. मात्र हा संदेश खोटा आहे. त्यामुळे कुठलीही लिंक येताच त्यावर क्लिक करू नका. असे संदेश पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक बलसिंग राजपूत यांनी सांगितले.
अफवांप्रकरणी ३८४ गुन्हे
कोरोनाबाबत अफवा पसरवून दहशत निर्माण करणाºया व याला धार्मिक रंग देत समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नाांत असलेल्याविरुद्ध राज्यात ३८४ गुन्हे नोंद झाले. महाराष्ट्र सायबर विभागाने ही कारवाई केली.